दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर Ranati Movie
मनोरंजन

दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर

Ranati Movie : दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवर ‘रानटी’ चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे.

शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकर सांगतात की,'अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.'

चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड यांनी पार पाडली आहे. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन यांनी केली आहे.

या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटाचं नाव यावरून ‘रानटी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे,. यामुळे चाहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT