ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजींची अकाली एक्जिट झाली होती. यानंतर त्या जागी कोण येणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. या मालिकेत पूर्णा आजींची व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाली होती. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारली होती. ज्योती यांच्या आकस्मिक निधनानंतर ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची निवड झाल्याचे समोर येत आहे. नुकताच रोहिणी यांचा मालिकेच्या सेटवरील व्हीडियो व्हायरल होतो आहे. (Latest Entertainment News)
यामध्ये पूर्णा आजींच्या गेटअप मध्ये रोहिणी यांची एंट्री होताना दिसते आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर अनेकांनी ही भूमिका दुसऱ्या कुणाला देण्यात येऊ नये अशी मागणीही केली होती. पण मेकर्सनी एका दमदार एंट्रीसह रोहिणी हट्टंगडी ही भूमिका साकरणार असल्याचे स्पष्ट केले.
नेटीझन्सनीही आनंदाने नव्या पूर्णा आजीचे स्वागत केले आहे. कमेन्ट बॉक्समध्ये ते म्हणतात, ‘ ज्योती चांदेकर यांनी अविस्मरणीय अशी भूमिका साकारली आहे. पण मेकर्सने हे शिव धनुष्य पेलत अशा रोहिणी मॅडमना निवडून योग्य निर्णय घेतला.’ तर एकाने 'ही रीप्लेसमेंट परफेक्ट आहे.’ अशी कमेंट केली आहे. एकजण म्हणतो, 'छान आहे पण मिस यु जुन्या पूर्णा आजी.’
राजश्रीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणतात, ‘ एखाद्या कलाकाराने साकारलेली भूमिका मी पुढे नेणं. हे इतक्या वर्षात पहिल्यांदाच घडत आहे. ज्योति माझी चांगली मैत्रीण होती.’ या प्रोमोमध्ये प्रियाला पूर्णा आजी चांगलेच खडे बोल सुनावताना दिसते आहे.