Thamma Song Tum Mere Na Huye out now
मुंबई - आगामी चित्रपट थामा मधील पहिले गाणे Tum Mere Na Huye रिलीज झाले आहे. या चित्रपटातील आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या सिजलिंग केमिस्ट्रीने फॅन्सचं मन जिंकलं आहे. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण पुष्पा या गाजलेल्या चित्रपटातील लोकप्रिय सामी-सामी या गाण्यापेक्षाही नव्या गाण्यात रश्मिकाच्या घायाळ करणाऱ्या मुव्ह्ज आहेत.
या गाण्यात आयुष्मान आणि रश्मिकाची केमिस्ट्री फॅन्सच्या मनाला भुरळ घालत आहे. रश्मिकाच्या जबरदस्त डान्स मुव्ह्जमुळे फॅन्सना पुन्हा एकदा पुष्पातील ‘सामी सामी’ गाण्याची आठवण झाली. मात्र यावेळी तिच्या एनर्जी आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे प्रेक्षक अधिकच घायाळ झाले आहेत. गाण्यात रश्मिकाचा ग्लॅमरस अंदाज आणि आयुष्मानचा चार्मिंग लूक दिसत आहे.
फॅन्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “हे गाणं या वर्षातील सर्वात हॉट ट्रॅक ठरेल.” आणखी काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की, हे गाणे 'आज की रात' सारखं वाटत आहे.
हे गाणे शेअर करत रश्मिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं- ''काही प्रेमकथा कधीच मरत नाहीत... त्या आत जळत राहतात. #TumMereNaHuye सह आवाज अनुभवा, वेदना अनुभवा.''
थामा हा चित्रपट अलीकडेच आपल्या दमदार ट्रेलरमुळे चर्चेत आला होता. थामा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी भेटीला येणार आहे.