स्त्री, भेडीया, मुंज्या आणि सरकटानंतर आता मॅडोक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स एक नवा व्हिलन घेऊन समोर येत आहे. थामा’ असे या आगामी हॉरर कॉमेडी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाशी संबंधित व्हीडियोही समोर आला आहे. यामध्ये थामाच्या रिलीजची तारीखही शेअर केली आहे. (Latest EnterEntertainment News)
मेकर्सनी सगळ्यात शक्तिशाली व्हिलन कोण असा प्रश्न करत त्यानी थामाबाबत जाहीर केले आहे. या 42 सेकंदांच्या व्हीडियोमध्ये नवाजुद्दीनचा व्हॉईसओव्हर आहे. स्त्री, भेडीया, मुंज्या आणि सरकटा यांच्यापेक्षाही भयानक व्हिलन म्हणत त्यांनी थामाची ओळख करून दिली आहे. 19 ऑगस्टला थामाचा टीजर समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘स्वातंत्र्यदिवसाचे विशेष औचित्य साधत नंबर 1 सिनेमा स्त्री 2 आज एक वर्षाचा झाला आहे. या आनंदाप्रीत्यर्थ दिनेश विजन मॅडोक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या जगाचा विस्तार करत आहोत. एक शक्तिशाली व्हिलन म्हणून थामाच्या जगाची पहिली झलक तुम्हाला 19 ऑगस्टला पाहायला मिळेल. या दिवाळीला थामा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तयार व्हा हा अध्याय एक प्रेम कहाणी आहे. जी पाहिली गेली नाही.
या सिनेमात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सिनेमात रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात एका वॅम्पायरची लवस्टोरी दाखवली जाणार आहे. या पूर्वीच्या दोन सिनेमात दिसलेला राजकुमार राव या सिनेमात दिसणार की नाही याबाबत अजून काही समोर आलेले नाही.