Thalapthy Vijay fan emotional moment  Pudhari
मनोरंजन

Thalapthy Vijay | सुपरस्टारचा मोठेपणा इथेच दिसला! प्रेमाखातर थलपतिची तहान-भूक हरपली; ४५ अंश तापमानात उभा राहिला, श्रिया सरनने सांगितला भावूक प्रसंग

फॅन्ससाठी उन्हात उभ्या राहिलेल्या विजयचा किस्सा व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री श्रिया सरनने थलपती विजयबद्दल सांगितलेला एक जुना किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ४५ अंश तापमानात विजयचे चाहते त्याला भेटण्यासाठी जमले होते. त्या वेळी व्हॅनमध्ये आरामात बसण्याऐवजी विजय चाहत्यांसोबत फोटो काढण्यासाठी उन्हात उभा राहिला, असे श्रियाने सांगितले.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय आपल्या अभिनयासोबतच चाहत्यांवरील प्रेमामुळेही नेहमी चर्चेत असतो. आता अभिनेत्री श्रिया सरनने सांगितलेला विजयचा एक जुना किस्सा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे, साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय. वाचा सविस्तर.

श्रिया सरनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयसोबतच्या शूटिंगदरम्यान घडलेला अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, “ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा मी विजयसोबत शूटिंग करत होते. बाहेर प्रचंड उकाडा होता. तापमान जवळपास ४५ अंशांपर्यंत गेले होते. अशा परिस्थितीत बाहेर उभे राहणेही कठीण होते. मात्र, विजयचे चाहते त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठ्या संख्येने तिथे जमले होते.”

थलपति विजयच्या यशानंतर तामिळनाडूचा राजकीय चेहराच बदलला. प्रत्येकजण आपापले तर्क लावत असताना मात्र, अभिनेत्री श्रिया सरनने फॅन मोमेंट शेअर केला आहे. तिने एका चित्रपटाच्या सेटवरील दुपारच्या आठवणींचा प्रसंग व्यक्त केला.

श्रिया म्हणाली, "ही ती वेळ होती जेव्हा मी विजयसोबत शूटिंग करत होते. बाहेर प्रचंड उकाडा होता. तापमान साधारण ४५ अंश असावे आणि अशा वेळी बाहेर उभे राहणेही अशक्य असते. तो एप्रिल महिना होता. त्याचे चाहते त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आले होते; आणि विजयने कोणताही ॲटिट्यूड न दाखवता थेट व्हॅनिटीच्या बाहेर आला. त्या कडक उन्हातही आपल्या व्हॅनच्या बाहेर उभे राहणे त्याने पसंत केले. लोकांना त्याच्यासोबत फोटो काढता येतील म्हणून तो ४५ अंश तापमानातही फॅन्ससोबत उभा राहिला.

भाजून काढणाऱ्या दुपारच्या उन्हात हवं तर तो व्हॅनमध्येच बसू शकला असता. लोक त्याला पाहण्यासाठी इतक्या दूरवरून आले होते आणि त्यांना निराश करायचं नव्हतं.

श्रिया म्हणाली, ''लोक हे प्रसंग विसरतात. तो असे अविस्मरणीय बनवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत असतो. येथील तरुण वर्ग आणि तामिळनाडूची जनता, या सर्वांनाच त्याचा प्रवास माहिती आहे. त्याची मेहनत, त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम चाहत्यांच्या मनात कायम आहे."

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापति विजयचा तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) च्या विजयची भविष्यवाणी पूजा हेगडेने केली होती, असा दावा तिने केला आहे. पूजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, जी जन नायकन' च्या सेटचा व्हिडिओ आहे. एका जुन्या व्हिडिओमध्ये पूजा व्हाईटबोर्डाकडे इशारा करते. त्यावर लिहिलं होतं- 'निवडणूक कोण जिंकेल?' ती थलापति विजयकडे इशारा करत हसचेय हे पाहून विजय लाजत चेहरा लपवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT