Thalapathy Vijay jana Nayagan pre sales booking updates  pudhari photo
मनोरंजन

Thalapathy Vijay|'Jana Nayagan'ची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल १० लाख प्री-बुकिंग पार करणारे पहिले भारतीय अभिनेते ठरले थलपती विजय

Thalapathy Vijay | 'Jana Nayagan'ची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल १० लाख प्री-बुकिंगचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय अभिनेते ठरले थलपती विजय

पुढारी वृत्तसेवा

'वारिसू', 'GOAT' नंतर, १० लाखांहून अधिक तिकिटांची विक्री होणारा विजय यांचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. 'थलपती' विजय यांच्या बहुचर्चित 'जन नायकन' चित्रपट अखेर आज जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, चित्रपटाने रिलीजपूर्वीच असा विक्रम केला आहे, ज्यामुळे विजयच्या नावावर भारतीय चित्रपटसृष्टीत आणखी एक ऐतिहासिक नोंद झाली आहे. एका ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाच्या १० लाखांहून अधिक तिकिटांची प्री-सेल्स झाली असून, पहिला शो सुरू होण्यापूर्वीच हा टप्पा पार करण्यात आला.

सलग तिसऱ्या चित्रपटासाठी १० लाखांहून अधिक प्री-सेल्स

'वारिसू' आणि 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (GOAT)'नंतर आता 'जन नायकन'नेही रिलीज पूर्वी १० लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री नोंदवली आहे. यासह विजय सलग तीन चित्रपटांसाठी ऑनलाईन बुकिंगमध्ये १० लाखांचा आकडा पार करणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. या विक्रमी कामगिरीची सोशल मीडियावर मोठी चर्चा झालीय. दुसरीकडे, चाहत्यांकडून विजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दमदार ॲडव्हान्स बुकिंग

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद आता थिएटरमधील गर्दीतही दिसून येत आहे. अनेक शहरांतील सकाळचे शो हाऊसफुल्ल झाले असून, थिएटरबाहेर चाहत्यांनी फटाके, ढोल-ताशे आणि जल्लोष करत विजयच्या चित्रपटाचे स्वागत केले आहे. चित्रपटगृहाबाहेर देखील चाहत्यांची प्रचंड गर्दी झालेली दिसली. कुणी हातात विजय यांची प्रतिमा घेऊन उभं होतं तर कुणी त्यांच्या फोटोंवर दुग्धाभिषेक करताना दिसलं.

रिलीज पूर्वी अनेक अडचणींचा सामना

एच. विनोथ दिग्दर्शित या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी काही अडथळेही आले होते. सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आणि काही कायदेशीर कारणांमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलावी लागली होती. याशिवाय, मात्र, या सर्व अडचणींवर मात करत चित्रपटाने तिकीट विक्रीत विक्रमी कामगिरी केली आहे.

विजय यांच्या करिअरमधील अखेरचा चित्रपट

राजकारणात पूर्णवेळ येण्यापूर्वी 'जन नायकन' हा विजय यांचा अखेरचा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज, प्रियामणी, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन आणि नारायण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT