gunshot on Punjabi Singer Teji Kahlon  file photo
मनोरंजन

Punjabi Singer Teji Kahlon | 'आता पोटात गोळी लागलीय, पुढच्या वेळेस जीवे मारू;' कॅनडामध्ये पंजाबी गायक तेजी कहलोवर हल्ला

Punjabi Singer Teji Kahlon |'आता पोटात गोळी लागलीय, पुढच्या वेळेस जीवे मारू;' कॅनडामध्ये पंजाबी गायक तेजी कहलोवर हल्ला

स्वालिया न. शिकलगार

attack on Punjabi Singer Teji Kahlon

मुंबई - कॅनडामध्ये पंजाबी गायक तेजी कहलोवर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.गँगस्टर रोहित गोदाराच्या टोळीतील सदस्यांनी दावा केला आहे की, तेजी कहलोच्या पोटात गोळी लागली आहे. खूप आधी त्यांच्यात गँगवॉर सुरु होता, त्यातून हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रोहित गोदाराच्या गँगशी संबंधित महेंर्द सरण दिलाना, राहुल रिनाऊ आणि विकी पहलवानने म्हटले आहे की, आम्ही यासाठी तेजीला गोळी मारली की, कारण तो आमच्या विरोधात ॲक्टिव्ह गँगला शस्त्रे पुरवत होता. गँगकडून जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय- आम्ही तेजी कहलोवर कॅनडामध्ये फायरिंग केली आहे. त्याच्या पोटात गोळी लागलीय. त्याने समजलं तर चांगली गोष्ट आहे. नाही तर असे जर घडले नाही तर पुढील वेळेस जीवे मारू.

रोहित गोदाराच्या गँगने पंजाबी गायकावर आरोप करत म्हले आहे की, तो आमच्या विरोधातील गँगना आर्थिक सपोर्ट करत होता. या शिवाय त्या लोकांसाठी हेरगिरी करत होता. सध्या कॅनडाची तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.

कोण आहे तेजी कहलो?

तेजी कहलों कॅनडामध्ये राहणारा एक पंजाबी गायका आणि अभिनेता आहे. तो Punjabi diaspora संगीत क्षेत्रात ॲक्टिव्ह आहे. त्याच्या संगीतात पारंपरिक पंजाबी लोक वाद्ययंत्रे आणि लयीचे आधुनिक संगीताचे मिश्रण पाहायला मिळते. "झूमर", "मीठी जेल", "टाईम चक दा", "बापू तेरा पुत्त निकम्मा" यासारखी गाणी त्याच्या नावावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT