Tara Sutaria first look from toxic movie  instagram
मनोरंजन

Tara Sutaria: गीतू मोहनदासच्या चित्रपटात रेबेका बनून आली तारा सुतारिया, फर्स्ट लूक आऊट

Tara Sutaria: गीतू मोहनदासच्या चित्रपटात रेबेका बनून आली तारा सुतारिया, फर्स्ट लूक आऊट

स्वालिया न. शिकलगार

दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’मध्ये तारा सुतारिया ‘रिबेका’ या भूमिकेत दिसणार आहे. तिचा फर्स्ट लूक समोर येताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

geetu mohandas yash movie toxic first look Tara Sutaria


बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’मुळे चर्चेत आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्या या चित्रपटात तारा ‘रिबेका’ नावाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील ताराचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला असून तो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

समोर आलेल्या फर्स्ट लूकमध्ये तारा सुतारिया एका गंभीर आणि रहस्यमय अंदाजात दिसत आहे. आतापर्यंत ग्लॅमरस आणि रोमँटिक भूमिकांसाठी ओळखली जाणारी तारा या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचे दिसते.

'टॉक्सिक ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटा त साऊथ स्टार यश, कियारा आडवाणी, हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत आहेत. ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी, या चित्रपटाने आधीच चर्चा निर्माण केली आहे. आता पुढील अपडेट्समध्ये या चित्रपटाबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तारा सुतारियाचा नवा लूक आऊट

तारा सुतारियाचा शानदार रेबेका लुक आऊट करण्यात आला आहे. रेबेका शक्ती आणि शस्त्रे वापरते. रिलीज झालेल्या लूकमध्ये ती छोट्य़ा हेअरस्टाईलमध्ये दिसतेय. तिचे बोट ट्रिगरवर आहे. रेबेका नाजूक आणि सुंदर, पण अस्वस्थ दिसते. तिची या चित्रपटात अगदी वेगळी भूमिका असणार आहे.

तारा सुतारियाच्या रेबेका भूमिकेबद्दल बोलताना गीतू मोहनदास म्हणाल्या, "मला नेहमीच ताराभोवती प्रेम जाणवले आहे. कदाचित ती संयमी आहे म्हणून. ती कमफर्टेबल आहे. कदाचित त्याची व्याख्या करण्याची गरज नाही. मला सुरुवातीलाच समजले की तिच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिच्यावर दबाव आणणे किंवा तिच्याकडून अधिक मागणी करणे नाही, तर तिला हवं ते करू देणं होतं."

‘टॉक्सिक’ १९ मार्च रोजी रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. फर्स्ट लूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून ताऱ्याच्या अभिनयाची आणि नव्या लूकची जोरदार प्रशंसा केली जात आहे. अनेक जण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यश आणि गीतू मोहनदास लिखित 'टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' हे एकाच वेळी कन्नड आणि इंग्रजीमध्ये शूट करण्यात आले आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि इतर अनेक भाषांमध्ये डब केले जाणार असल्याची माहिती मिळतेय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजीव रवी सिनेमॅटोग्राफर, रवी बसरूर संगीतकार, उज्ज्वल कुलकर्णी एडीटर, टीपी आबिद प्रोडक्शन डिझायनर, हॉलिवूड अ‍ॅक्शन दिग्दर्शक जेजे पेरी (जॉन विक)अशी तांत्रिक बाजू सांभाळणारी टीम आहे. केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या बॅनरखाली वेंकट के. नारायण आणि यश निर्मित हा चित्रपट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT