अभिनेत्री तारा सुतारियाने एका पोस्टमध्ये रूमर्ड बॉयफ्रेंड वीरने 'My’ अशी कमेंट केल्यापासून या दोघांच्या डेटिंगच्या अफावेवर शिक्कामोर्तब झाले आहे. एपी ढील्लों याच्यासोबत थोडी सी दारूमध्ये दिसलेल्या ताराने या अल्बम दरम्यानचा एक फोटो शेयर केला त्याच्या पोस्टवर वीरने ही कमेंट केली आहे. ही कमेंट व्हायरल होताच नेटीझन्सनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला
तारा याआधी आदर जैनला डेट करत होती. पण अरमानने तिच्याशी ब्रेक अप करत तिच्या मैत्रिणीशी अलीकडेच लग्नगाठ बांधली. त्यामुळे ताराने पण आता move ऑन करावे असा सल्ला चाहते तिला देत असत. ताराने आता हा सल्ला फारच मनावर घेत नव्या नात्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मिता वीरची आई आहे. वीरने अभिनय, म्युझिक डायरेक्शन तसेच घरचा बिझनेस या सगळ्यात हात आजमावतो आहे. त्याचे वडील संजय पहारिया बिझनेसमन आहेत तर आई स्मिता सोबो फिल्मसची मालकीण आहे. तर त्याची मावशी प्राणिती शिंदेही राजकारणात सक्रिय आहे.
वीरने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने ग्लोबल financial मॅनेजमेंटमध्ये बीए केले आहे.
वीरची नेट वर्थ 50 लाख रुपये आहे. त्याच्या कमाईचे साधन अभिनय, बिझनेस व्हेंचर्स आणि म्युझिक कोलॅबोरेशन हे आहे.
वीरने 2025 मध्ये रिलीजमध्ये रिलीज स्काय फोर्समधून बॉलीवूड डेब्यू केला आहे. स्क्वाड्रन लीडर अजमदा बोप्पया देवय्या ही व्यक्तिरेखा त्याने या सिनेमात साकारली होती.पहिल्या सिनेमातून त्याने 50 लाखांची कमाई केली आहे. याशिवाय त्याने भाऊ शिखरसोबत इंडियाविन गेमिंग कंपनीची स्थापना केली आहे. वीरची आणि त्याच्या भावाच्या जॉइंट व्हेंचरची एकूण संपत्ती पाहता तो 25 करोड सांगितली जाते.
वीरचे नाव यापूर्वी कोस्टार सारा अली खान हिच्याशी जोडले गेले होते. पण या दोघांचे ब्रेक अप झाले आहे. यानंतर त्याने हरनाज संधु आणि मानुषी छिल्लर यांनाही डेट केले होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही.
डेटिंग लिस्ट मोठी असलेला वीर तारासोबत कायमस्वरूपी नात्यात राहो अशी इच्छा त्याचे फॅन्स व्यक्त करत आहेत