बिग बॉस 19च्या नव्या सीझनला दमदार सुरुवात झाली आहे. या घरातील प्रत्येक सदस्याचे खरे रंग रूप आता समोर येत आहे. यातील एक सदस्य आहे तान्या मित्तल. सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर असलेली तान्या सध्या बिग बॉसच्या घरात हटके अंदाजात दिसत आहे. एकीकडे सोशल मिडियावर पीआर टीम तिची इमेज धार्मिक आणि सात्विक अशी उभी करण्यात गुंतली आहे. तर घरात तान्या तिच्या हटके स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. (Latest Entertainement News)
पण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती बॉयफ्रेंड बलाराज सिंगच्या व्हीडियोमुळे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्याची एक्स आणि बिग बॉसची स्पर्धक तान्या मित्तल हिच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामध्ये तो म्हणतो, तान्याला केवळ तिच्या मतांचे आणि तिच्या इगोचे पडलेले असते.
तान्या आणि धार्मिकता यांचा संबंध जोडला जातो तेव्हा मला वाईट वाटते. तिच्या इतके फेक मला कोणी वाटत नाही.
धार्मिक असल्याचे सांगत अत्यंत वाईट शब्दांचा वापर करणे ही खासियत आहे. तान्या तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन चूक केली. कारण तिथे खरे चेहरे दिसून येतात. तुम्ही करत असलेले ढोंग तिथे फारकाळ चालणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि स्वत:मध्ये बदल करा.
तान्या अनेक मंदिरांमधून तूला कॅमेरा खेचून घेऊन बाहेर हाकलून दिले आहे. कारण त्यांना देखील तुझा खरा चेहरा माहिती आहे. कारण तुझी धार्मिकता ही किती फेक आहे अनेकांना माहिती आहे. असे अनेक पंडितजी आणि मंदिरातील लोकांचे मला फोन आणि मेसेजही येत आहेत.
माझ्या धर्माचा असा अपमान होताना पाहणे त्रासदायक आहे. तिने मला न विचारता माझे व्हीडियो पोस्ट केले आहेत. तान्या करत असलेल्या शब्दांचे प्रयोग एके दिवशी तिच्या घरातून बाहेर येण्याचे कारण बनणार आहेत. तुम्ही जो दिखावा करत आहात तो फारकाळ चालणार नाही.’ याशिवाय तान्या तिच्या स्टेटमेंटमुळेही चर्चेत आहे.
घरात आल्या आल्या तान्याने सांगितले कि तिला बॉस म्हणून हाक मारावी. यामुळे सोशल मिडियावर मात्र उलट सुलट कमेंट्स येत आहेत. अनेकांनी हो गोष्ट मस्करीत घेतली तर काहीनी तिला ओव्हरकॉन्फिडंट म्हणून बोलावले आहे.
तान्याचे सोशल मिडियावर 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने आध्यात्मिक एफ्लून्सर म्हणून इमेज निर्माण केली आहे.