Tanvi Kolte Net Worth Pudhari
मनोरंजन

Tanvi Kolte Net Worth: 'बिग बॉस मराठी 6' ची विजेती तन्वी कोलतेची संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Tanvi Kolte Net Worth: ‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती तन्वी कोलतेने उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी जिंकली. तिची अंदाजित संपत्ती 50 ते 80 लाखांच्या दरम्यान असल्याचं मानलं जातं.

पुढारी वृत्तसेवा

Tanvi Kolte Net Worth: मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. जवळपास 100 दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक दमदार स्पर्धकांनी आपली छाप सोडली. मात्र शेवटी प्रेक्षकांच्या मतांवर आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावलं.

या संपूर्ण सीझनमध्ये तन्वीचा शांत स्वभाव, टास्कमधील सातत्य आणि प्रामाणिक खेळ यामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे तिला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्यानंतरच तिच्या विजयाची चर्चा सुरू झाली होती. अंतिम टप्प्यातही तिने आपली कामगिरी कायम ठेवत ट्रॉफीवर नाव कोरलं. या सिझनचे होस्ट अभिनेते रितेश देशमुख होते, आणि ‘भाऊचा धक्का’ या भागाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सीझन विशेष गाजला.

तन्वी कोलतेची संपत्ती किती?

विजेतेपदानंतर आता तन्वी कोलतेच्या कमाई आणि संपत्तीबाबतही चर्चा रंगू लागली आहे. उपलब्ध माहितीनुसार, तिची एकूण संपत्ती साधारण 50 लाख ते 80 लाखांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

कमाईचे प्रमुख स्रोत कोणते?

तन्वीची कमाई विविध माध्यमांतून होते. मराठी मालिकांमधील तिच्या कामामुळे ती घराघरात पोहचली. विशेषतः ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेनंतर तिची लोकप्रियता वाढली. याशिवाय मॉडेलिंग, जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियावरूनही तिला चांगलं उत्पन्न मिळतं. रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम तिच्या कमाईवरही झाला आहे.

‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर तन्वी कोलतेचं नाव पुन्हा एकदा घराघरात पोहोचलं आहे. तिच्या साधेपणामुळे आणि मेहनतीमुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. आगामी काळात तिच्याकडे अधिक मोठ्या संधी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टीप: तन्वी कोलतेच्या कमाईची माहिती विविध रिपोर्टवर आधारित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT