new family in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah tv serial
मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा गोकुलधाममध्ये नवीन राजस्थानी व्यापारी कुटुंबाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. १७ वर्षांनंतर नव्या हास्याचा फवारा पाहायला मिळणार आहे. या मालिकेने अलीकडेच त्यांचा १७ वा वर्धापन दिन साजरा केलाय आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी या प्रसंगी एक मोठा खुलासा केलाय.
त्यांनी घोषणा केली की, लवकरच एक नवीन कुटुंब गोकुळधाम सोसायटीमध्ये सामील होणार आहे. रिपोर्टनुसार, गोकुळधामचा नवीन सदस्य एक राजस्थानी कुटूंब असेल, जो सोसायटीत आपली छाप पाडण्यास तयार आहे. असे वृत्त आहे की, राजस्थानी कुटुंबाचा प्रमुख एक व्यापारी असेल. तो इलेक्ट्रॉनिक्स दुकान चालवणाऱ्या जेठालालचा प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहील. सोसायटीत जेठालाल, बबीता जी, बाबूजी, टप्पू सेना, भिडे, पोपटलाल, मिस्टर हाथी इतके सदस्य आहे. आता राजस्थानी परिवार काय काय धमाल उडवते, हे पाहणं रंजक असेल.
काही फोटोंमध्ये दोन ऊंट कॅम्पसमध्ये घेऊन जाताना दाखवण्यात आले आहे. त्यावरून अंदाज लावता येतो की, हा चार लोकांचा एक कुटूंब असेल. राजस्थानी शैलीत सजवलेले ऊंट थेट सोसायटीत येणार असल्याचे वृत्त आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा फेम तन्मय वेकारिया म्हणजेच बाघाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातील फोटो खूप जुने आहेत. बाघासोबत दिलीप जोशी दिसत असून बाघाच्या माहितीनुसार तो आणि जेठालाल एकाच थिएटर ग्रुपचा हिस्सा होते. ज्यासाठी ते आंतरराष्ट्रीय टूरवर जात होते. तेथे जाऊन परफॉर्मन्स करायचे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.