मनोरंजन

स्वराज्य सौदामिनी ताराराणी : मराठ्यांची साम्राज्ञी देणार बलाढ्य शत्रूला टक्कर

स्वालिया न. शिकलगार

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे ज्‍यांचे वर्णन केले गेले आहे. अशा ताराराणी यांची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून उलगडणार आहे. १५ नोव्हेंबरपासून स्वराज्य सौदामिनी ताराराणी प्रेक्षकांच्य़ा भेटीस येत आहे.

ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखण्याचं कार्य मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी केली. एक वाघ तर दुसरा सिंह. ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का….असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचे, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा  या ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेचा प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.

प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे. इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडे पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.

१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे! पाहा १५ नोव्हेंबरपासून, सोम.-शनि., संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT