Swara Bhasker casting couch revelation: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती राईज अँड फॉलच्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसत आहे. स्वरा राईज अँड फोलच्या घरात देखील आपल्या बेधडक वृत्तीचे दर्शन घडवत आहे. तिने कास्टिंग काऊच बाबत खुलेपणाने आपला एक किस्सा सर्वांना सांगितला.
विरेंद्र सेहवागच्या या शो मध्ये स्वरा भास्करने आपल्याला कसा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आणि आपण त्या विचित्र दिग्दर्शकला कसा नकार दिला हे वर्णन करून तेजप्रताप यादव आणि प्रियांका चाहर चौधरी यांना सांगितलं.
स्वराच्या म्हणण्यानुसार तिच्या एका चित्रपटाचा दिग्दर्शक हा तिच्या मागेच लागला होता. स्वरा म्हणाली की तनु वेड्स मनुनंतर माझी लीड फिल्म होती. ५६ दिवसांचे शूट होते. त्याची मी हिरोईन होते.
स्वराने सांगितलं की दिग्दर्शन मला सीन समजावून सांगत होता. अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर प्रेम असलं पाहिजे. असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे असं तो बडबडत होता. मी होय होय करत होते.
स्वरा म्हणाली त्यानंतर त्याने मला मेसेज करायला सुरूवात केली. तुम्ही अशा आहात तुम्ही तशा आहेत... मला तो कविता पाठवत होता. मी त्याच्या समोरच बसले होते तरी तो हे करत होता.
स्वराने एका लव्ह सीनचा देखील किस्सा सांगितला, ती म्हणाली की मला डायरेक्टरने सीनची रिहर्सल करायची आहे असं सांगितलं. मी विचारलं कोण कोण आहे. तो म्हणाला की, फक्त आपण दोघं डिस्कस करायचं आहे. मी म्हणाले की तुम्ही कॅमेरामन आणि अभिनेत्याला देखील बोलवा. रिहर्सल आहे तर प्रत्येक जण हवा. आपण दोघं एकटे काय करणार. मी गेस्ट हाऊसमध्ये थांबली होती. मी हे म्हणून आपल्या रूममध्ये गेले.
स्वराने सांगितले की, दोघे जण बसून दारू पीत होते. मी विशीतील मुलगी या दोन दारूड्यांच्या मध्ये रिहर्सल करणार असं त्यांना कसं वाटलं. मी तिथून पळून गेले. त्यानतंर रात्री माझ्या रूमचा दरवाजा वाजवण्यात आला.
स्वरा म्हणाली ज्यावेळी मी दरवाजा उघडला त्यावेळी तो डायरेक्टर नशेत झुलत होता. मला म्हणतो की मला तुला मिठी मारायची आहे. मी नाही म्हणून सांगितलं.
हा किस्सा सांगत असताना तेज प्रताप आणि प्रियांका चौधरी यांनी तू त्याला थप्पड का मारली नाहीस असं विचारलं. त्यावर स्वरा म्हणाली की तो चित्रपटाचा दिग्दर्शक होता. त्यावेळी हिंम्मत नव्हती आता असं झालं असतं तर नक्कीच थप्पड मारली असती.