मनोरंजन

शाकाहारी लोकांचा स्वधर्मीपणा; बकरी ईदला स्वराने साधला निशाणा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच ओळखली जाते. तिच्या या वर्तनामुळे कधी तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर कधी तिचे नेटकरी भरभरून कौतुक करत असतात. आताही बकरी ईदच्या मुहूर्तावर स्वराने शाकाहारी लोकांवर निशाणा साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा तिला नेटकऱ्यांनी खरेखोटे सुनावले आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतेच तिच्या एक्स (X ) ट्विटरवर बकरी ईदच्या निमित्ताने शाकाहारी लोकांवर निशाना साधत एक जेवनाने भरलेली प्लेट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने शाकाहारी असलेल्या लोंकावर प्रश्न उपस्थित केला आहे. यात तिने लिहिलंय आहे की, नलिनी उनगर नावाच्या फूड ब्लॉगरला तिच्या शाकाहारी असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

या पोस्टमध्ये स्वराने लिहिले आहे की, 'प्रामाणिकपणे खरं सांगू… शाकाहारी लोकांचा स्वधर्मीपणा वाढला आहे. मला शाकाहारी लोकांबद्दल ही गोष्ट समजत नाही. तुमचा संपूर्ण आहार गाय, म्हशींच्या दुधापासून बनलेला असतो. यामुळे लहान जनावरांना त्याचे आईचे दुध मिळत नाही. काही वेळा लहान वासरांना त्यांच्या आईच्या दुधापासून वंचित ठेवले जाते, गायींना जबरदस्तीने गर्भधारणा करण्यात येते, नंतर त्यांना त्यांच्या बाळांपासून वेगळे करण्यात येते आणि त्यांचे दूध चोरले जाते, हे योग्य नाही. त्यापैक्षा शाकाहारी लोकांनी पालेभाज्या जास्त खाव्यात. यामुळे संपूर्ण वनस्पती नष्ट होणार नाही. जावू दे सोडा. आज बकरी ईद आहे. खा-प्या आणि मस्त आराम करा.

स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. काही शाकाहारी लोकांनी स्वराचे हे म्हणणे पडले आहे. यामुळे ते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. मात्र, काही नेटकऱ्यांनी स्वराला पुन्हा एकादा चांगलेच धारेवर धरत ट्रोल केलं आहे.

नलिनी सोशल मीडियावर शाकाहारी जेवणाचे सतत फोटो शेअर करत असते. आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहित असते की, "मला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे. माझे ताट अश्रू, क्रूरता, पाप यापासून मुक्त आहे.'' यामुळे स्वराने तिला हा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT