Suriya's Big Hit Karuppu Pudhari photo
मनोरंजन

Suriya's Big Hit Karuppu|सूर्या-त्रिशाचा ओटीटीवर धमाकेदार प्रवेश, कधी व कुठे पाहता येणार; बॉक्स ऑफिसवर 'करुप्पू'ची उधळण

Suriya's Big Hit Karuppu | सूर्या-त्रिशाचा ओटीटीवर धमाकेदार प्रवेश, कधी व कुठे पाहता येणार; बॉक्स ऑफिसवर 'करुप्पू'ची उधळण

स्वालिया न. शिकलगार

सूर्या आणि त्रिशा अभिनीत 'करुप्पू' हा चित्रपट थिएटरमध्ये मोठा हिट ठरल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. फँटसी, ॲक्शन आणि ग्रामीण कथानकाचा संगम असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

तमिळ सुपरस्टार सूर्या आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांची प्रमुख भूमिका असलेला 'करुप्पू' हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिग्दर्शक आर.जे. बालाजी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या फँटसी-ॲक्शनपटाने बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवले. ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी, पौराणिक संदर्भ आणि थरारक ॲक्शन यांचा सुरेख मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो. याच वैशिष्ट्यांमुळे 'करुप्पू'ने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली.

तमिळ भाषेबरोबरच तेलगूमध्ये 'वीरभद्रुडू' या नावाने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन्ही भाषांतील प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवला. प्रदर्शित झाल्यानंतर अनेक आठवडे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली होती. त्यामुळे २०२६ मधील यशस्वी चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.

आता चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्याची संधी गमावलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'करुप्पू'चा डिजिटल प्रीमियर १२ जून २०२६ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.

प्राईम व्हिडिओने सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगची अधिकृत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तमिळ आणि तेलगूसह इतर काही भाषांमध्येही हा चित्रपट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूर्याच्या दमदार अभिनयासह भव्य दृश्यरचना, प्रभावी कथानक आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देणारा 'करुप्पू' आता ओटीटीवर किती लोकप्रिय ठरतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

त्रिशा कृष्णन आणि सूर्या यांच्या 'करुप्पू' चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी रुपयांचा टप्पा आधीच ओलांडला आहे. ड्रीम वॉरियर पिक्चर्सच्या बॅनर निर्मित, करुप्पूचे बजेट १४० कोटी रुपये आहेत. आणि २४ दिवसांत १९३.४० कोटी देशांतर्गत आणि जगभरात ३०४.१५ कोटी कमावले आहेत. या चित्रपटात सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांच्यासोबतच दिग्दर्शक बालाजी मुख्य भूमिकेत आहेत. इंद्रंस, नट्टी सुब्रमण्यम, स्वासिका, शिवदा आणि सुप्रीत रेड्डी हे देखील यात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT