सूरज चव्हाणचे केळवण Pudhari
मनोरंजन

Suraj Chavan: अंकिताच्या घरी थाटात पार पडले सूरज चव्हाणचे केळवण; बायकोसाठी घेतला असा उखाणा

काही दिवसांपूर्वीच त्याने भावी पत्नीबाबत चाहत्यांशी शेयर केले होते

अमृता चौगुले

बिग बॉस पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण याच्या घरी आता लगीनघाई सुरू झाली आहे. सुरज लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भावी पत्नीबाबत चाहत्यांशी शेयर केले होते. आता या जोडीच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. या सगळ्यात करवलीसारखी सूरजच्या पाठीशी आहे ती अंकिता वालावलकर. (Latest Entertainment News)

अंकिताने सूरजच्या केळवणाचा व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये ती म्हणते आहे. ‘लग्नाची तयारी सुरू झालीये, मग केळवण तर असणारच ना! बघायचंय कोणाचं आहे, चला!’ असे म्हणत अंकिताने सुरज आणि त्याची पत्नी संजना यांची झलक दाखवली आहे. यावेळी सूरजने संजनासाठी उखाणाही घेतला आहे.

सुरज त्याच्या उखण्यात म्हणतो, 'बिग बॉस' जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न… संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!’ तर या उखाण्याच्या खेळात संजनाही मागे नाही. आपल्या उखाण्यात ती म्हणते, ‘बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको… सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!'

फक्त केळवणच नाही तर अंकिता संजनाला लग्नाच्या खरेदीतही मदत करतानाचा व्हीडियो सूरजने त्याच्या इन्स्टावरुन शेयर केला आहे. यामध्ये अंकिता संजनाला साडी आणि दागिने निवडताना मदत करताना दिसते आहे. सुरजच्या लग्नाची तारीख समोर आली नाही पण लवकरच तो लग्नाच्या बेडीत अडकेल असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT