सुरज चव्हाणच्या हळदीत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने केलेल्या धमाल नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अक्षदाचा स्टायलिश लूकही चर्चेत असून कार्यक्रमातील उत्साह, जल्लोष आणि दोघांची केमिस्ट्री यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
Jahnavi Killekar dance in Suraj Chavan haldi ceremony
मुंबई - 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार लगबग सुरु आहे. आता सुरजच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात होत असून अवघ्या काही दिवसांत तो लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाच्यापूर्वीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. सुरजच्या घरी हळदी समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच्या हळदी समारंभात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने धमाल डान्स केला. सोबतच अक्षदाही सज्ज झाल्या आहेत. विविध विधींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुरज चव्हाण सध्या लग्नसमारंभामुळे चर्चेत आहे. त्याच्या हळदीच्या विधीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने हळदीत दिलेल्या धमाल परफॉर्मन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. सुरजच्या हळदीला जान्हवीने पारंपरिक पोशाखात ठुमके लावले.
दुसरीकडे अक्षदा तयार करण्यात आल्या. जान्हवीने हे व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अक्षदाचे तयार करतानाचे व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने कॅप्शनमध्ये म्हटलंय-'सुरजच्या लग्नाची तयारी'. तर सुरजच्या हळदीचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
जान्हवी किल्लेकर आणि सुरज चव्हाण हे मालिकांमुळे घराघरात पोहोचलेले चेहरे आहेत. त्यामुळे त्यांच्या ऑफ-स्क्रीन मैत्रीची झलकही हळदीत दिसली. हळदीच्या सोहळ्यात जान्हवीने एनर्जेटीक डान्स करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर होताच काही तासांतच तो व्हायरल झाला. फॅन्सनीही कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून कॉमेंट्स दिल्या आहेत.
यावेळी जान्हवीने डार्क पिंक कलरचा सूट घातला होता. तर हळदीच्या डान्समध्ये सुरजने व्हाईट कलरचा पेहराव केला होता. तिच्या आणि सुरजच्या हळदीतील डान्सने फॅन्सची मने जिंकली. दोघांनीही हळदीच्या रंगात जल्लोष केला. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि जवळच्या कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
सुरजने स्वतःही नाचत हळदीचा विधी मनसोक्त एन्जॉय केला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहेत. सुरज चव्हाणच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत.