अभिनेता सतीश शाह यांच्या निधनानंतर सुप्रिया पिळगावकर यांनी “त्यांची शेवटची भेट आठवते” अशा शब्दांत भावनिक पोस्ट केली आहे. त्यांच्या या श्रद्धांजली पोस्टने चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले असून सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल झाली आहे.
Supriya Pilgaonkar on Satish Shah
मुंबई – सुप्रिया पिळगावकर यांनी अभिनेते सतीश शहा आणि त्यांची पत्नी मधु शहा यांचा शेवटचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांना त्यांची शेवटची भेट आठवते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना सोशल मीडियावरून भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टी शोकाकुल झाली असून, अनेक कलाकारांनी त्यांच्याशी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत. त्यात सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.
सुप्रिया पिळगावकर यांनी सतीश शाह यांचा शेवटचा फोटो शेअर केला. सुप्रिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं, “त्यांची शेवटची भेट आजही डोळ्यासमोर आहे. नेहमी हसतमुख, प्रेमळ आणि सकारात्मक राहणारे सतीशजी आता आपल्या सोबत नाहीत, हे मान्य करणं कठीण आहे.”
सुप्रिया यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
''खूप लवकर गेले सतीश! गेल्या रविवारी आपण भेटलो होतो यावर विश्वास बसत नाही!🥹त्या आठवणीचा माझ्या हृदयावर ठसा उमटल्याचा आनंद आहे. मला माहित आहे की तू नेहमीच तुझ्या प्रिय मधुवर लक्ष ठेवत आहेस. तिच्या हास्यातून आम्हाला तुझी उपस्थिती जाणवेल. तुमची आवडती गाणी गाऊन आणि नाचून.''
सुप्रियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं की, “आपल्या शब्दांनी डोळ्यांत पाणी आलं”, तर काहींनी म्हटलं, “सतीश शाहसारखे कलाकार पुन्हा होणार नाहीत.”
सतीश शहा यांच्या पत्नी मधू यांना अल्झायमरच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अलिकडेच, मुंबईतील जुहू येथील प्रार्थना मेळाव्यातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये गायक सोनू निगमसोबत त्यांचे गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
सतीश शाह यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘ये जो है जिंदगी’, ‘मैं हूं ना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ अशा अनेक हिट प्रोजेक्ट्समुळे ते प्रत्येक घराघरात ओळखले गेले.