Super Dancer Chapter 5 will release soon  Instagram
मनोरंजन

Super Dancer Chapter 5 | चार वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा धुमाकूळ घालणार बच्चे कंपनी

Shilpa Shetty Super Dancer Chapter 5 | 'माँ ही होती है बच्चों की सफलता के पीछे का असली सितारा'- शिल्पा शेट्टी

स्वालिया न. शिकलगार

Super Dancer Chapter 5 release date

मुंबई - असामान्य परफॉर्मन्स आणि जिद्द, बलिदान आणि स्वप्नांच्या हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सुपर डान्सर येत आहे! सुपर डान्सर १९ जुलैपासून दर शनि-रवी रात्री ८ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर पहता येणार आहे. डान्स रिॲलिटी शोचे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर आता पुनरागमन होत आहे. या कार्यक्रमात देशातील १२ डान्सर मुले आपला डान्स सादर करतील.

या सीझनमध्ये डान्सच्या सोहळ्यापेक्षा अधिक काहीतरी असणार आहे. यामध्ये या छोट्या स्टार्सच्या मागे असलेल्या प्रेरणा स्रोतांवर देखील प्रकाश टाकण्यात येणार आहे

परीक्षक शिल्पा शेट्टी म्हणते, ''एका स्पर्धकाच्या मंचापर्यंतच्या प्रवासाव्यतिरिक्त अन्य बाबीवर प्रकाश टाकणे ही कोणत्याही रियालिटी शोसाठी दुर्मिळ गोष्ट आहे. या सीझनमध्ये, सुपर डान्सर या कार्यक्रमात स्पर्धकांच्या आईचा प्रेरणादायक प्रवास देखील दाखवण्यात येणार आहे. मी स्वतः एक आई असल्यामुळे मी हे जाणते की, पत्नी, मुलगी, बहीण वगैरे भूमिका निभावताना मातृत्वाला नेहमी प्रधानक्रम असतो. आपले मूल हे नेहमीच आपल्या जीवनाचा आणि हृदयाचा केंद्रबिंदू असते. आपण मंचावरील गुणी मुलांचे कौतुक करतो, पण तितकेच कौतुक त्यांच्या आईचे देखील व्हायला हवे! सर्व मुलांच्या वतीने मी अशा प्रत्येक मातेचे आभार व्यक्त करते कारण, मुलांच्या यशाच्या मागील खरी प्रेरणा आईच असते.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT