Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Box Office Day 14
मुंबई - 'कांतारा : चॅप्टर १' ने सनी संस्कारी की तुलसी कुमारी चित्रपटाला घाम फोडला आहे. सारख्याच दिवशी रिलीज झालेल्या वरुण - जान्हवीच्या या चित्रपटाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वरुणचा 'सनी संस्कारी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. 'सनी संस्कारी' रिलीज होऊन १४ दिवस झाल्यानंतरदेखील अपेक्षेहून कमी कमाई झालीय. याउलट, “कांतारा : चॅप्टर १” ने साधारण ६०० कोटींचा टप्पा पार केला आहे आणि ७०० कोटींच्या दिशेने त्याची वाटचाल आहे.
विशेष म्हणजे “कांतारा” चे प्रदर्शन अनेक भाषांमध्ये झाले — हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड — ज्यामुळे त्याची प्रेक्षकसंख्या आणि स्क्रीन संख्या दोन्ही वाढल्या.
रोमँटिक कॉमेडी ड्रामा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला. वरुण-जाह्नवीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडल. सोबतच कथा आणि गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पण ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने घाम फोडला.
वरुण धवन - जाह्नवी कपूरशिवाय या चित्रपटात रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि मनीष पॉल यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेला ९.२५ कोटी रुपये कमावले होते. रिपोर्टनुसार, बुधवारी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'ने १४ व्या दिवशी १ कोटी हून अधिक कमाई केलीय. भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचे टोटल कलेक्शन ५४.१० कोटी रुपये होऊ शकते.
दिवस - कलेक्शन
१- ९.२५ कोटी रुपये
२- ५.५ कोटी रुपये
३- ७.७ कोटी रुपये
४- ७.७५ कोटी रुपये
५- ३.२५ कोटी रुपये
६- ३.२५ कोटी रुपये
७- २.३५ कोटी रुपये
८- २.२५ कोटी रुपये
९- २.२५ कोटी रुपये
१०- ३.२५ कोटी रुपये
११- ३.२५ कोटी रुपये
१२- १.२५ कोटी रुपये
१३- १.५ कोटी रुपये
१४- १ कोटी रुपये