पुढारी ऑनलाईन : सनी लियोनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणाली, सुरुवातीच्या काळात मला धमकीचे ई-मेल येत होते. लोकांचा माझ्याविरोधात प्रचंड रोष होता.
मला बिग बॉसची ऑफर आली होती. परंतु, लोकांचा माझ्याविरोधात जो काही वर्षापूर्वी असलेला रोष बघता मी कुठलाही वितार न करता थेट या ऑफरला नकार दिला होता. भारतातील लोकांचा माझ्यावर रोष आहे आणि यामुळेच मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला होता. मी काहीतरी चुकीचे तर करत नाहिये ना?.
प्रत्येकाला वाटते की, आपल्याला कोणीही जज करू नये. त्यावेळी मला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात होते. अनेकांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यावेळी मी ठरवले होते की, मी परत कधीच भारतात जाणार नाही.
हेही वाचा :