gadar 3 updates  Instagram
मनोरंजन

Gadar 3 Release Date | ‘गदर ३’ विषयी मोठी अपडेट; काय असेल कहाणी? कधी होणार रिलीज?

Gadar 3 Release Date | ‘गदर ३’ ची मोठी अपडेट; काय असेल कहाणी? कधी होणार रिलीज?

स्वालिया न. शिकलगार

gadar 3 updates

मुंबई : सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर 'गदर २' यशानंतर पुढच्या फ्रेंचायझीची प्रतीक्षा फॅन्सना आहे. आता गदरच्या दिग्दर्शकाने 'गदर ३' च्या रिलीज डेटवरून पडदा हटवला आहे. सोबतच सांगितले आहे की, पुढील कहाणी काय असेल आणि कधीपर्यंत रिलीज होईल.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासाठी गदरची पुढील कहाणी दाखवणे एक आव्हानात्मक होतं. सर्वात अविस्मरणीय पैलू म्हणजे उत्कर्ष शर्मा. मूळच्या चित्रपटात तारा सिंहच्या छोट्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती. पुढील फ्रेंचायझीमध्ये त्याचे मोठं होणं आणि कथा पुढे जाणे आणि आता तिसऱ्या भागातही खास कथा असेल. ज्याची प्रतीक्षा फॅन्सना लागून राहिलीय.

गदर ३ वर काम सुरू होणार असल्याचे शर्मा यांनी संकेत दिले आहेत. ही कहाणी पुन्हा एकदा भारत-पाक संघर्षावर आधारित असेल. मागील चित्रपटांप्रमाणे आधीपेक्षा या चित्रपटात अनेक थरार असणार आहेत. अधिक ड्रामा, इमोशन्स आणि देशभक्तीसह चित्रपटाची वापसी असेल.

आधीच माहित होतं ५०० कोटी कमावणार

अनिल शर्मा यांनी सांगितलं की, त्यांना आधीच माहिती होतं की, चित्रपट सुपरहिट होईल. ते म्हणाले, 'गदर खूप मोठा हिट चित्रपट होता. आणि गदर २ पहिल्या दिवसापासून मोठे यश मिळवण्यात यशस्वी ठरला. खरंतर, २ ऑगस्टला मी झी ला एक ईमेल पाठवला होता, ज्यामध्ये भविष्यवाणी केली होती की, चित्रपट ५०० कोटींचा आकडा पार करेल. हे तर ॲडव्हान्स बुकिंग सुरू होण्याआधीपासून समजलं होतं..’

'गदर ३' ची मोठी अपडेट

अनिल शर्मा यांनी 'गदर-३' वर मोठी अपडेट दिलीय. ते म्हणाले, 'आम्ही गदर ३ नक्कीच बनवत आहोत. कहाणी पुढे सुरुच राहिल. 'गदर' आणि 'गदर-२' दोन्हींच्या यशानंतर समजले की, या चित्रपटाची कहाणी आणि पात्रे लोकांच्या मनात एक खास घर करून गेले आहेत आणि तिसऱ्या भागात देखील ते जारी राहील.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT