Suniel Shetty Sooraj Pancholi Kesari Veer Trailer Out Now
मुंबई : 'केसरी वीर' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले असून ट्रेलर सोबत एक पंच लाईन शेअर करण्यात आली आहेत. त्यामध्ये लिहिलंय -' धर्म की रक्षा, आस्था का संकल्प और सोमनाथ की पवित्र भूमि का गौरव'. चित्रपटाची कहाणी महानायकाच्या वीरतेवर आधारित आहे, ज्यांनी सोमनाथ मंदिरावर वाईट नजर टाकणाऱ्यांचा खात्मा केला. देशासोबतच आस्थेची रक्षा करणाऱ्या महानायकांची ही कथा आहे.
केसरी वीरचा ट्रेलर जवळपास ३ मिनिट ७ सेकंदाचा आहे. 'ये शिव कौन है' अशा डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते, 'भाई जान ये काला पत्थर है जिसमें भस्म लगाते हैं'... त्यानंतर सोमनाथ मंदिरावर आक्रमण होताना दिसते.
एका दमदार डायलॉग सोबत सूरज पंचोलीची एन्ट्री होते. 'केसरी वीर' ट्रेलरमध्ये 'हमारे राम की भूमि है, हमारे कृष्ण की भूमि है, हमारे शिव की भूमि है। हम राजपूतों के खून में हार लिखी ही नहीं'...'उस राख में से एक चिंगारी निकलेगी। एक योद्धा की पहचान उसके तलवार पर लगे लहू से होती है, उसके नाम से नहीं...असे डायलॉग ऐकू येतात.
प्रिंस धीमान दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय शिवाय सूरज पंचोली आणि आकांक्षा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. कानू चौहान हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
हमीरजी गोहिल यांच्या वीरतेची कहाणी असून ते देशाचे महान नायक होते, जे सोमनाथ मंदिर आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तुघलक साम्राज्याविरोधात लढले होते.