मनोरंजन

शिर्केपाटील कुटुंबात दाखल होणार गौरीसारखी दिसणारी नवी पाहुणी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत लवकरच नवा धमाका पाहायला मिळणार आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली.

ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. गौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी अरेला कारे करणारी आहे. आता ही गौरी आहे की, दुसरी कुणी? हे मालिकेच्या पुढील भागांमधून समजणार आहे. गौरीच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला ती पळता भुई थोडं करणार असल्याचे पाहायला मिळाणार आहे. यामुळे चाहत्यांना या मालिकेतील पुढील भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जयदीप रचणार गौरीच्या हत्येचा कट?

आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला कळला आहे. गौरी आई होऊ शकत नाही, असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे.

शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे. यातच गौरीने जगाचा निरोप घेतला.परंतु, गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्तीने शिर्केपाटील कुटूंबियात एन्ट्री केली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT