Subodh Bhave-Sai Tamhankar new marathi movie  pudhari photo
मनोरंजन

Subodh Bhave-Sai Tamhankar|सई ताम्हणकर वेगळ्या रुपात! सुबोध भावे घेऊन येताहेत 'बोल बोल राणी', झलक पाहाच

Subodh Bhave-Sai Tamhankar |सई वेगळ्या रुपात, सुबोध भावे घेऊन येताहेत 'बोल बोल राणी', झलक पाहाच

स्वालिया न. शिकलगार

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सुबोध भावे आणि सई ताम्हणकर यांच्या आगामी ‘बोल बोल राणी’ चित्रपटाची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. या झलकमध्ये सई ताम्हणकर एका नव्या आणि वेगळ्या अंदाजात दिसत असून, तिचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर ही झलक शेअर करताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाची कथा आणि इतर तपशील अद्याप गुप्त ठेवण्यात आले असले तरी या पहिल्या झलकने सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दमदार कलाकार सुबोध भावे आणि सई ताम्हणकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच समोर आली असून, सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या झलकमध्ये सई ताम्हणकर एका वेगळ्याच रुपात दिसत असल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सुबोध भावे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ‘बोल बोल राणी’ची झलक शेअर केली. या पोस्टनंतर काही वेळातच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

अपहरण, रहस्य आणि सस्पेन्सचा खेळ

प्रेक्षकांना एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट असणार आहे. 'न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड' निर्मित, सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला

काय आहे बोल बोल राणीची कथा?

हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नाहीये. एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. चित्रपटाचे संगीत रहस्याचे वातावरण तयार करणारे आहे. या चित्रपटातील खास संवाद देखील चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. सिड विंचुरकर यांचे दिग्दर्शन आहे.

‘बोल बोल राणी’ हा केवळ एक सस्पेन्स चित्रपट नाही तर मानवी स्वभावाचे आणि नातेसंबंधांचे अनेक पदर उलगडणारा थ्रिलर आहे...या चित्रपटाची कथा आणि त्यातील प्रत्येक पात्राचा संघर्ष प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल...मुख्य चित्रपटात प्रेक्षकांसाठी रहस्याचा एक मोठा खजिना दडला आहे, जो १० जुलै रोजी चित्रपटगृहात उलगडेल."
-सिड विंचुरकर, दिग्दर्शक

अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर, अमित भानुशाली हे निर्माते आहेत तर यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी, आयुष कृप्लानी सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर हिच्यासह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे हे मुख्य भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT