अनेक बायोपिकमधून लोकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोध आता ऐतिहासिक बायोपिकमध्ये नाही तर धार्मिक बायोपिकमध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सुबोधने सोशल मिडियावर शेयर केले आहे. श्री बाबा नीब करोरी असे या बायोपिकचे नाव आहे. हा हिंदी सिनेमा आहे. (Latest Entertainment News)
या पोस्टरमध्ये सुबोध बाबांच्या लूकमध्ये दिसत आहे. छोटे केस, दाढी, अंगाभोवती घोंगडी घेतलेला सुबोध हुबेहूब नीम करोली बाबांसारखाच दिसतो आहे.
आज लखनऊ मध्ये आमच्या आगामी " बाबा नीम करोली" यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपटाच्या पोस्टर च अनावरण संपन्न झाले. बाबांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले.
लवकरच हा चित्रपट रसिकांसमोर येईल.
जय श्रीराम!
जय हनुमान!
हे कॅप्शन देत त्याने चाहत्यांना या सिनेमाबाबत माहिती दिली आहे
......आणि डॉ. काशीनाथ घाणेकर
बालगंधर्व
लोकमान्य: एक युगपुरुष
संत तुकाराम
नीम करोलीबाबा हे दैवी पुरुष मानले जातात. ते हनुमानाचे भक्त होते. त्यांचे भक्त त्यांना बजरंगबलीचा अवतार मानतात. नैनिताल येथील कैची भवन येथे त्यांनी आश्रम स्थापन केला आहे. त्यांचे 1973 मध्ये निधन झाले. त्यांच्या भक्तांच्या यादीत अनेक सेलिब्रिटीही आहेत. त्यापैकी स्टीव्ह जॉब्स, मार्क जुकरबर्ग, ज्यूलिया रॉबर्टस, अमेरिकेतील संरक्षण खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची नावे यात आहेत.