पुढारी ऑनलाईन डेस्क - सध्या स्त्री २ चित्रपटाची चर्चा आहे. प्रेक्षक 'स्त्री २' साठी चित्रपटगृहात खुर्चीला खिळून बसले आहेत. चित्रपटगृहांना हाऊसफुल्लचा बोर्डदेखील लावलेला दिसत आहे. 'स्त्री २' मध्ये सरकटाची महत्तवाची भूमिका आहे. 'स्त्री २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ३०० कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. या चित्रपटाच्या यशामागे सर्व कलाकारांशिवाय सरकटेचेदेखील योगदान आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटातील सरकटा हा ग्राफिक्सच्या मदतीने पडद्यावर आणलेला आहे. पण, मुळात ही भूमिका साकारणार सुनील कुमार असून त्याची उंची ७ फूट ६ इंच आहे. त्याला सोशल मीडियावर 'जम्मूचा ग्रेट खली' नावाने देखील ओळखले जाते. सुनील ग्रेट खलीशीदेखील उंच आहे. एक उत्तम पैलवान आहे, जम्मू आणि काश्मीर पोलिसात कॉन्स्टेबल आहे. अभिनेता सुनीलला 'द ग्रेट अंगार' म्हणून देखील ओळखले जाते.
एका मुलाखतीत दिग्दर्शक अमर कौशिकने सांगितलं होतं की, कास्टिंगच्या टीमने सुनीलला शोधलं. पैलवानाची उंची पाहून त्याला या भूमिकेसाठी निवडण्यात आले. दिग्दर्शकाने पैलवानाच्या बॉडी शॉट्सचा वापर केला आहे. तर सरकटाचा चेहरा वीएफएक्सच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. पैलवानी शिवाय सुनीलला हँडबॉल आणि व्हॉलीबॉल खेळणेदेखील आवडते.