Spirit Tripti Dimri - prabhas first look  x account
मनोरंजन

Spirit Tripti Dimri | 'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरीचा पहिल्यांदाच लूक आला समोर, प्रभासच्या 'स्पिरीट'मधील 'त्या' फोटोची चर्चा

Spirit Tripti Dimri | 'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरीचा पहिल्यांदाच लूक आला समोर, प्रभासच्या 'स्पिरीट'मधील 'त्या' फोटोची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

‘ॲनिमल’मधील भूमिकेनंतर चर्चेत आलेली तृप्ती डिमरी आता प्रभासच्या ‘स्पिरीट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिचा व्हायरल लूक पाहून चाहते उत्सुक झाले असून, या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Spirit Tripti Dimri - prabhas first look revealed

रणबीर कपूरसोबतच्या ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. तिच्या अभिनयासोबतच तिच्या ऑनस्क्रीन उपस्थितीची मोठी चर्चा झाली. आता ‘ॲनिमल’नंतर पहिल्यांदाच तृप्तीचा नवा लूक समोर आला असून, तो थेट प्रभासच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट स्पिरीटमधून. स्पिरीट चित्रपटातील प्रभास आणि तृप्ती डिमरीचा लूक व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा होताना दिसतेय.

सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तृप्ती डिमरी एका वेगळ्याच आणि प्रभास समोर उभी असलेली दिसतेय. ती व्हाईट स्लिव्हलेस बलाऊजमध्ये दिसत असून सिगारेट पेटवताना दिसतेय. ती सिगारेट प्रभास ओढत असताना दिसत आहे. प्रभासचे खांद्यापर्यंतचे कुरळे केस आणि डोळ्यांवर गॉगल, पाठीवर जखमांवर केलेली मलमपट्टी दिसत आहे. साधा मेकअप, गंभीर भाव लूकमुळे लक्ष वेधून घेतले जात आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर केले. त्यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये कॅप्शन लिहिली की, "भारतीय चित्रपट... तुमचा अजानुबाहू/अजानुबाहू पहा."

चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पिरिट पोस्टर शेअर असून त्यामध्ये लिहिले आहे, "चला स्पिरिटच्या पहिल्या उत्साही पोस्टरसह नवीन वर्षाचे स्वागत करूया...."

चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पिरिट पोस्टर शेअर असून त्यामध्ये लिहिले आहे, "चला स्पिरिटच्या पहिल्या उत्साही पोस्टरसह नवीन वर्षाचे स्वागत करूया...."

तृप्ती हलक्या राखाडी रंगाच्या साडीत प्रभासच्या जवळ उभी असलेली त्याची सिगारेट पेटवताना दिसत आहे. तृप्तीचा चेहरा शांत आणि गंभीर दिसत आहे. सुरुवातीला, संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटासाठी दीपिका पादुकोणला कास्ट करायचे होते. पण, सप्टेंबर, २०२४ मध्ये दीपिका आई झाल्यानंतर, तिने आठ तासांच्या शिफ्टची मागितली होती. याव्यतिरिक्त, तिने आठवड्यातून फक्त पाच दिवस काम करण्याची आणि जास्त मानधन देण्याची मागणी केली होती. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा अभिनेत्रीच्या या सर्व मागण्या मान्य नसल्यामुळे दीपिकाच्या मागण्यांना अव्यावसायिक म्हटले आणि तिच्या जागी चित्रपटात तृप्ती डिमरीला घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT