मनोरंजन

कारण गुन्ह्याला माफी नाही : ‘स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड’ गुन्हेगारांना शोधून काढणार!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. 'तुमची मुलगी काय करते' या थरारक मालिकेची टीम 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेसाठीही कार्यरत आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत.

निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत. ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेत. झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेत. त्यातून होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखी मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहे. यातून चोरी, सिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहे.

त्यासाठीच महाराष्ट्र पोलीस दलात 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' नेमण्यात आलं आहे. त्याचा भाग इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे आणि ACP अनुजा असणार आहेत. ते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, हे आपल्याला पाहायला मिळेल.

हरीश दुधाडे इन्स्पेक्टर भोसले या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. चंद्रलेखा जोशी हिने आपल्या अभिनायाच्या जोरावर जमदाडे ही व्यक्तिरेखा पोहोचवलीय. लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील मालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT