south cinema thalapathy vijay watches ajith kumar le mans race with trisha krishnan in england dating rumours resurface
पुढारी ऑनलाईन : Vijay-Trisha Viral Video : साऊथ सुपरस्टार अजित कुमार सध्या इंग्लंडमध्ये आपल्या रेसिंगमुळे चर्चेत आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी अभिनेता आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयही लंडनमध्ये पोहोचले. यावेळी अभिनेत्री तृषा कृष्णनही त्यांच्यासोबत दिसली. आता दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
शनिवारी सिल्व्हरस्टोन येथे मिशेलिन ले मांस कप रेसचे आयोजन करण्यात आले होते. ही रेस पाहण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता विजयही तेथे पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री तृषा कृष्णनही रेसिंग सर्किटमध्ये दिसली. सर्किटमध्ये पोहोचतानाचा तृषाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पुन्हा एकदा एकत्र दिसले विजय-तृषा
व्हायरल व्हिडीओमध्ये तृषा जीन्स, टी-शर्ट आणि मरून रंगाचे जॅकेट परिधान केलेली दिसत आहे. ती कारमधून उतरून रेसिंग सर्किटमधील टेंटच्या दिशेने जाताना दिसते. याशिवाय आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये विजय रेसचा आनंद घेताना दिसत आहेत. याचदरम्यान तृषाही त्यांच्या जवळ दिसत आहे. विजय आणि तृषा यांचा हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांमध्ये त्यांच्या एकत्र उपस्थितीची चर्चा सुरू झाली आहे.
लंडनमध्ये राधिका सरथकुमारसोबतही दिसली तृषा
सिल्व्हरस्टोनला पोहोचण्यापूर्वी तृषा कृष्णनला लंडनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्यासोबतही पाहण्यात आले होते. राधिकाने तृषासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहता पाहता व्हायरल झाला.
राधिका सरथकुमारदेखील अजित कुमार यांची रेस पाहण्यासाठी लंडनला पोहोचल्या आहेत. यापूर्वी त्यांनी रेसपूर्वी अजित कुमार यांची भेटही घेतली होती.
विजय आणि तृषाच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण
विजय आणि तृषा कृष्णन यांच्या नात्याबाबतच्या अफवा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
दोघांची ऑनस्क्रीन जोडी ‘लिओ’ या चित्रपटातही पाहायला मिळाली होती. या चित्रपटानंतर त्यांच्या जवळिकीच्या चर्चांना आणखी वेग आला. मार्च २०२६ मध्येही विजय आणि तृषा यांना चेन्नई येथे चित्रपट निर्माता कल्पाथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र पाहण्यात आले होते. दोघांनी एकत्र एंट्री केल्यामुळे त्यावेळीही त्यांच्या उपस्थितीने मोठी चर्चा रंगली होती.
विजय यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्यासोबतच्या घटस्फोटाबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर विजय-तृषाच्या नात्याच्या चर्चांना आणखी जोर आला होता.