सोनू सूद  
मनोरंजन

ज्याने सोनू सूदचं पहिलं फोटोशूट केलं; तो ‘फतेह’मध्ये दिसणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'फतेह'च्या रिलीजसाठी सज्ज असलेला अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर त्याचा पहिल्या पोर्टफोलिओचा फोटो शेअर केला आहे. यामागची एक खास गोष्टदेखील उघड केली आहे. या फोटो मागची गोष्ट सांगताना सोनू सांगतो की, ज्या छायाचित्रकाराने त्याचे हे पहिले पोर्टफोलिओ फोटो काढले होते तो 'फतेह' मध्ये एक अतिशय मनोरंजक भूमिकेत अभिनेता म्हणून काम करणार आहे. "त्या दिवसांत मला वाटले की @ronnykaula द्वारे क्लिक केलेले हे सर्वोत्कृष्ट चित्रे आहेत 😂😂😂 माझ्या शूटनंतर जवळचा मित्र बनलेल्या @ronnykaula ने शूट केले. आता मी त्याला फतेहमध्ये एका अतिशय मनोरंजक भूमिकेत कास्ट केले आणि दिग्दर्शित केले. आम्ही नुकतेच आमच्या भूमिका बदलल्या. कॅमेरा समोर आणि मागे,"त्याने त्याच्या पहिल्या पोर्टफोलिओचे फोटो टाकून ही कॅप्शन लिहिली."

अधिक वाचा-

या महिन्याच्या सुरुवातीला सोनू सूदने नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतचे फोटो शेअर केला होता. ते या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचं संगितल आहे. सोनू याबद्दल सांगतो, "मी आयुष्यभर ज्याचे कौतुक केले आहे अशा व्यक्तीचे दिग्दर्शन करणे खूप खास होते. वृत्तानुसार दिग्गज अभिनेते या चित्रपटात हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे."

अधिक वाचा-

'फतेह'चे दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि मुख्य अभिनेता म्हणून काम करणाऱ्या सोनूने याआधी खुलासा केला होता की, चित्रपट पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागली. मुख्य अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिसची देखील भूमिका असलेला हा चित्रपट एक सायबर क्राईम थ्रिलर आहे जो बॉलीवूडच्या ॲक्शनर्सना एक दर्जा मिळवून देणार आहे.

अधिक वाचा-

या चित्रपटात हॉलिवूडसारखे ॲक्शन सीक्वेन्स दाखवण्यात येणार आहेत. सोनू सूदच्या म्हणण्यानुसार 'फतेह' पाहिला आहे ते खूप प्रभावित झाले आहेत, ज्यामुळे त्यांना आणखी चित्रपट दिग्दर्शित करण्याच्या अनेक ऑफर आल्या. फतेह या वर्षी रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT