Sonu Nigam karnataka Concert:
मुंबई : आपल्या व्यक्तव्याने अनेकदा वादात सापडणारा सोनू निगम पुन्हा एकदा टीकेचा धनी होतो आहे. सोनूने नुकतेच कर्नाटकमधील एका कॉन्सर्टवेळी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्याच्यावर कर्नाटकातून टीकेची झोड उठली होती. याशिवाय कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सनेही (KFCC) सोनू विरोधात पावले उचलत असहकाराची भूमिका घेतली होती. सोनूने कन्नड गाण्याच्या विनंतीची तुलना दहशतवादी हल्ल्याशी केली होती. यानंतर त्याच्यावर कन्नड भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. प्रकरण तापताच सोनूने माघार घेत कन्नड संगीत, संस्कृतीबद्दल वाटत असलेले प्रेम व्यक्त केले. तसेच आपण कर्नाटकमधील लोकांचा आदर करत असून जनतेच्या निर्णयाचा कायम स्वीकार करेन असेही म्हणले. (Pudhari Entertainment Update)
यादरम्यान सोनू जोवर कर्नाटकातील जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने (KFCC) त्याला कोणतेही काम न देण्याचे ठरवले आहे.
KFCC चे अध्यक्ष नरसिंहालू या निर्णयावर बोलताना म्हणतात, ‘ आम्ही गायक सोनू निगम यांना कोणतेही सहकार्य करणार नाही आहोत. आम्ही त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देणार नाहीच याशिवाय राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी कार्यक्रम करू देणार नाही. ही प्रत्यक्ष बंदी नसली तरी आम्ही पुकारलेला असहकार आहे. सोनू यांच्या विधानामुळे कर्नाटकवासीयांची भावना दुखावली गेली आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी.
मागच्या आठवड्यात कर्नाटकातील एक कॉन्सर्टदरम्यान त्याला कन्नड गाणी म्हणण्यास सांगणाऱ्या व्यक्तीच्या अॅटीट्यूडबाबत वक्तव्य केले होते. बंगळुरूतील ईस्ट पॉईंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे पार पडलेल्या कॉन्सर्टदरम्यान हा प्रकार घडला. चार ते पाच युवकांच्या ग्रुपने त्याला कन्नड गाणी गाण्याची विनंती केली. 'कन्नड, कन्नड. हाच तो दृष्टिकोन किंवा कारण आहे, ज्या प्रकारचा दहशतवादी हल्ला पहलगाममध्ये सामान्य लोकांवर झाला.’ गाण्याच्या विनंतीची तुलना थेट दहशतवादी हल्ल्याशी केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
• कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) ने सोनूशी असहकार पुकारला आहे.
• कर्नाटका रक्षणा वेदिके या संघटनेने अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनूविरोधात तक्रार नोंदवली आहे.
• याशिवाय सोनू विरोधात भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita - BNS) अंतर्गत कलम ३५२(१) (विविध समूहांमध्ये वैरभाव पसरवणे) आणि ३५२(२) (फौजदारी बदनामी) अंतर्गत FIR दाखल करण्यात आला .
• मी कर्नाटकी लोकांना, भाषेला आणि संस्कृतीला फक्त कर्नाटकातच नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी असताना मान दिला आहे.
• कन्नड गाण्यांनाही मी इतर गाण्यांपेक्षा अधिक मान दिला आहे.
• कर्नाटकमध्ये कार्यक्रम करत असताना मी एक तासापेक्षा जास्त मेहनत कन्नड गाण्यांवर घेतली आहे.
• मी आता युवा कलाकार नाही. मी 51 वर्षांचा आहे. याचवेळी भर गर्दीत माझ्या मुलाच्या वयातील मुलाने मला कन्नडमध्ये धमकी दिल्यास तर मला त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे.
• कार्यक्रमाच्या पाहिल्याच गाण्यानंतर मुलाने हा तमाशा करायला सुरुवात केली. त्यावेळी मी त्याला सांगितले देखील की मला माझ्या लिस्टप्रमाणे जाऊ द्या. पण त्यांनी मला उघड धमकी दिली यात चूक कोणाची?
• जाती, धर्म, भाषा यांच्या नावाखाली द्वेष पसरवणे, धमकी देणे याविषयी मला चीड आहे. याप्रकरणानंतर मी जवळपास एक तास कन्नड गाणी गायली. मला कर्नाटकविषयी प्रेम आहे. त्यामुळेच हा निर्णय मी नम्रतेने स्वीकारेन.