सोनाक्षीने रिसेप्शनसाठी लाल साडी निवडली होती  Instagram
मनोरंजन

सोनाक्षी-जहीरचा विवाहसोहळा; लाल साडी, गजऱ्यात नटलेल्या अभिनेत्रीचा पहिला फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाक्षी सिन्हा - जहीर इकबाल अखेर लग्नबंधनात अडकले. या लव्हबर्डने काल सायंकाळी परिवार आणि जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये रजिस्टर मॅरेज केलं. दोघांनी सह्या केल्या. त्यानंतर एक रिसेप्शन देखील होस्ट करण्यात आलं. या पार्टीत तमाम बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली. या रिसेप्शनमधून पहिला फोटो समोर आला आहे.

२०१७ मध्ये सलमान खानच्या एका पार्टीत सोनाक्षी सिन्हाची भेट जहीर इकबालशी झाली होती. जहीर इकबालचे वडील हे सलमान खानचे चांगले मित्र आहेत. तर सलमाननेच सोनाक्षीला दबंग या चित्रपटातून मोठा ब्रेक दिला होता.

रजिस्टर मॅरेजवेळी सोनाक्षी सिन्हाने पांढरी साडी नेसली होती

असा होता सोनाक्षी-जहीरचा लूक

सोनाक्षी सिन्हा लग्नादरम्यान, व्हाईट साडी आणि केसात गजरा अशा सुंदर लूकमध्ये पाहण्यात आलं. रिसेप्शनमध्येही ती खूप सुंदर दिसली. रिसेप्शनमध्ये तिने लाल रंगाची साडी घातली होती. तिने केसांच्या भांगेत सिंदूर, केसात गजरा आणि हातात महावर (अलता) लावला होता. जहीर व्हाईट कलर इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसला. पार्टीत दोघे एकत्र फ्रेममध्ये पोझ देताना दिसले. तिच्या चेहऱ्यावर वेडिंग ग्लो देखील पाहायला मिळाला. यावेळी सोनाक्षी-जहीर दोघेही खूश दिसले.

जहीरने पांढरा इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केला

सोनाक्षी-जहीरने ७ वर्षे केलं डेट

सोनाक्षी सिन्हा - जहीर इकबालने ७ वर्षे एकमेकांना डेट केलं. सोनाक्षीला सलमान खानने इंडस्ट्रीमध्ये मोठा ब्रेक दिला होता. तर सलमान खानच्या अगदी जवळ जहीर इकबाल आहे. त्यांची भेट सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती. तिने सांगितलं की, २३ जूनला त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली होती.

केसात गजदार, भांगेत सिंदूर आणि दागिने अशा लूकमध्ये ती सुंदर दिसली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT