सोनाक्षी सिन्हा -जहीर इकबाल  
मनोरंजन

सोनाक्षी सिन्हाचं शुभमंगल सावधान! तारीख ठरली; जहीर इकबालसोबत सात फेरे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने लॉन्गटाईम बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत सात फेरे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, २३ जून रोजी दोघे सात फेरे घेतील. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जहीर इकबालला दीर्घका‍ळ डेट करत आहे. हा सोहळा एक खासगी कार्यक्रम असणार आहे. यामध्ये निवडक पाहुणे उपस्थिती लावतील. पण, या खास दिनी वेब सीरीज हिरामंडीच्या संपूर्ण कास्टला तिने आमंत्रित केलं आहे. तिच्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाहीये.

अधिक वाचा –

सोनाक्षी सिन्हा -जहीरने चित्रपटात केलंय एकत्र काम

सोनाक्षी आणि जहीर दीर्घकाळ एकमेकांना डेट करत आहेत. रिपोर्टनुसार, सलमान खानच्या एका पार्टी या लव्हबर्डची भेट झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियावर सार्वजनिकपणे आपले प्रेम व्यक्त केले होते.

जहीर इकबालला सलमानने केलं लॉन्च

सलमान खानने आपल्या बालपणीचा मित्र इकबाल रतनसींच्यासोबत आपले नाते कायम ठेवत त्यांचा मुलगा जहीरला नोटबुक चित्रपटातून लॉन्च केलं होतं. या चित्रपटात मोहनीश बहलची मुलगी प्रनूतननेदेखील डेब्यू केलं होतं. पण, हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.

अधिक वाचा –

सोनाक्षीचे करिअर

दुसरीकडे, सलमानसोबत सोनाक्षीने तिच्या करिअरमधील पहिला चित्रपट दबंग केला होता. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. संजय लीला भन्साळींची वेब सीरीज हीरामंडीमध्येही तिने दमदार भूमिका केली होती.

अधिक वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT