मनोरंजन

नाराजी दूर! शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इकबालने एकत्र दिली पोझ (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न चर्चेत आले आहे. याआधी अभिनेत्री सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा नाराज आहेत. ते लग्नात सहभागी होणार नाहीत. अशा गोष्टी पसरल्या होत्या. पण आता या अफवांवर पूर्णविराम लागला आहे. होणारा जावई जहीर इकबालची गळाभेट घेत शत्रुघ्न सिन्हा यांनी मीडियाला पोझ दिलीय. गुरुवारी सायंकाळी पहिल्यांदा एकत्र पाहण्यात आलं. पॅपराझींनी त्यांचे फोटोज, व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

अधिक वाचा – 

शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इकबाल यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोनाक्षीच्या फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे. शत्रुघ्न आणि जहीर दोघांनी गळाभेट पोझ दिली. यावेळी शत्रुघ्न खूप खूश दिसले. आणि त्यांनी पॅपराझींनी केलेल्या विनंतीनुसार 'खामोश' हा डायलॉगदेखील म्हटलं.

अधिक वाचा – 

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा देखील लग्नाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदा स्पॉट झाली. ती आपल्या कारमधून उतरली आणि अपार्टमेंटच्या इमारतीत गेली. ती बाहेर उभे असलेल्या पॅपराझींशी एक शब्ददेखील बोलली नाही. यावेळी ती टाळाटाळ करताना दिसली. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. तिने मास्कने आपला चेहरा झाकला होता.

अधिक वाचा –

सोनाक्षी शिवाय, तिचे आई-वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे जहीरच्या घरी दिसले. अर्ध्या रात्री ते जहीरच्या घरातून बाहेर पडताना दिसले. यावेळी शत्रुघ्न म्हणाले, 'मी निश्चितपणे लग्नाला उपस्थित राहिन. तिचा आनंद हा माझा आनंद आहे. आणि मी देखील या आनंदाचा हकदार आहे. तिला आपल्या लग्नाबद्दल निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी न केवळ तिची ताकदचं नाही तर संरक्षक म्हणून देखील इथे आहे.'

SCROLL FOR NEXT