अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात ४ लाखांची चोरी

anupam kher
anupam kher

मुंबई : सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे चार लाखांची रोकड आणि एक निगेटिव्ह रिळ चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन तरुणांनी आत प्रवेश करुन ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याच फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनुपम खेर यांचे अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक खासगी कार्यालय आहे. बुधवारी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी काम संपल्यानंतर लॉक लावून निघून गेले होते. रात्री उशिरा दोन तरुण त्यांच्या कार्यालयात घुसले होते. त्यांनी ड्रॉवरमधील चार लाखांची कॅश आणि एक निगेटिव्ह रिळ घेऊन पलायन केले होते. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news