Son Of Sardaar 2 Trailer out now
मुंबई- अजय देवगनचा चित्रपट फिल्म 'सन ऑफ सरदार २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लॉन्चवेळी मृणाल ठाकुर आणि अजय देवगन नव्या अंदाजात दिसत आहे. निर्मात्यांनी 'सन ऑफ सरदार' चे सीक्वल येतोय. आज सीक्वलचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे.
२३ जून रोजी अजय देवगनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'सन ऑफ सरदार २' चे एक मोशन पोस्टर जारी केले होते. यामध्ये कड्यातून वीज निघताना दिसत होती. अजयचा हा अंदाज फॅन्सच्या पसंतीस उतरला होता. मोशन पोस्टरमध्ये अजय देवगन साहसी दिसत आहे.
'सन ऑफ सरदार २' चे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करत आहेत. अजय देवगन, ज्योती देशपांडे, एनआर पचीसिया और प्रवीण तलरेजा निर्माते आहेत. अजय देवगन, मृणाल ठाकुरसह संजय मिश्रा यांचीही भूमिका असेल.
या चित्रपटाचे शूटिंग जुलै २०२४ मध्ये एडिनबर्गमध्ये झाले होते. ५० दिवस शूटिंग झाल्यानंतर लंडनमध्ये शूटिंग करण्यात आले. शूटिंग पंजाबमध्ये झाले. २५ जुलैला २०२५ रोजी रिलीज होईल.