अजय देवगणच्या सन ऑफ सरदारची रिलीज डेट पुढे गेली आहे. हा सिनेमा 25 जुलैला रिलीज होणार होता. पण मेकर्सनी नुकतेच ही तारीख पुढे ढकलल्याचे शेयर केले आहे. अजय देवगणच्या सन ऑफ सरदार 2 ची वाट त्याचे चाहते आवर्जून पाहात आहेत. पण चाहत्यांना काहीशी निराश करणारी बातमी सिनेमाच्या मेकर्सनी दिली आहे. या सिनेमाची रिलीजची तारीख एक आठवडा पुढे गेली आहे. सन ऑफ सरदार आता 1 ऑगस्टला रिलीज होते आहे.
25 जुलैला सन ऑफ सरदार 2 ला कोणतीही स्पर्धा नसताना हा सिनेमा पुढे गेल्याने अनेकांना आश्चर्यही वाटले आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा परम सुंदरी हा सिनेमाही 25 ला रिलीज होणार होता पण त्याच्या मेकर्सनी तो 29 ऑगस्टला रिलीज करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सन ऑफ.. चा रस्ता असाही मोकळा होता.
सन ऑफ.. चे रिलीज पुढे गेल्याचे कारण मेकर्सने जाहीर केले नाही. तरी सैय्यारा हे या सिनेमाच्या पुढे जाण्याचे मुख्य कारण असू शकते. असा अंदाज सिनेएक्सपर्ट्सनी लावला आहे. कारण सैय्याराने ओपनिंग दिवशीच बंपर कमाई केली आहे. या सिनेमाच्या बंपर कमाईची कुणालाच अपेक्षा नव्हती.
काही साइट्सनी सैयाराच्या धमाकेदार ओपनिंगमुळे सन ऑफचे शेड्यूल पुढे गेल्याचा दावा केला आहे. सैयारा ही धमाकेदार ओपनिंग करणारी या वर्षातला चौथा सिनेमा बनला आहे.
सन ऑफ सरदार सिनेमाचा दूसरा ट्रेलर उद्या म्हणजे 20 जूनला रिलीज होतो आहे. सन ऑफ सरदारची अडवांस बुकिंग 28 जुलैपासून सुरू होते आहे.