मुंबई - आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी सोहमचा केळवण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी सोहमचं केळवण केलं. व्हायरल जालेल्या फोटोंवरून दिसते की, हे केळवण एका रेस्टॉरंट मध्ये करण्यात आलं.
शिल्पा नवलकरने व्हिडिओ, फोटो पोस्ट करत लिहिलंय-आमची मुलं मोठी होतायत. सुचित्रा बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवरदेखील व्हिडिओ शेअर केले आहेत.
मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे की, तो अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न बंधनात अडकेल. त्यानंतर पूजा बिरारीने एक हिंट शेअर करून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. सोहम - पूजाने कधीही एकत्र फोटो शेअर केले नाहीत. सोशल मीडियावर एकमेकांविषयी काही पोस्टही शेअर केले नाही. पण त्यांच्या लग्नाच्या चर्चा खूप झाल्या. यामुळे पूजा निराश देखील झाली होती. या नाराजीमुळे तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
पूजाने आपल्या स्टोरीमध्य़े लिहिलं, 'ज्याला सत्य माहितीये तो शांत राहतो. बाकी लोकांना काहीही माहिती नसतं. परंतु, तेच अदिक बोलतात आणि सर्वांना सांगतात.'
सोहम बांदेकर हा आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. तो आपल्या आई-वडिलांच्या प्रोडक्शन कंपनीत काम करत आहे. 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेच्या प्रोडक्शनची जबाबदारी सोहमने सांभाळली होती. दुसरीकडे, पूजा बिरारी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिची 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मंजिरी ही भूमिका आहे.