Palak Muchhal meet Smriti Mandhana father video goes viral pudhari photo
मनोरंजन

Smriti Mandhana-Palash Muchhal | स्मृती मानधना-पलाश मुच्छलच्या नात्यात मोठी अपडेट; बहिण पलक मुच्छलने घेतली स्मृतीच्या वडिलांची भेट, व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana-Palash Muchhal | स्मृती मानधना पलाश मुच्छलचे पॅचअप, बहिण पलक मुच्छने घेतली स्मृतीच्या वडिलांची भेट, व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्यातील नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या, परंतु नुकताच पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिने स्मृतीच्या वडिलांची, श्रीनिवास मानधना यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून दोघांचे पॅचअप झाले, अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Smriti Mandhana-Palash Muchhal patch up?

भारतीय क्रिकेट विश्वातील 'नॅशनल क्रश' स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची आणि नात्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्तांना उधाण आले होते. आता त्यांच्या नात्याबद्दल एक नवी अपडेट समोर आली असून, दोघांचे 'पॅचअप' झाल्याचे बोलले जात आहे.

नोव्हेंबर, २०२५ मध्ये क्रिकेटर स्मृती मानधना - पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. सगळी तयारी झाली होती. पण, एका रात्रीत सर्वकाही बदललं. स्मृती आणि पलाशच्या नात्यात दुरावा आला आणि लग्न मोडले.

पलक मुच्छलने घेतली स्मृतीच्या वडिलांशी भेट

या सर्व चर्चांच्या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पलाशची मोठी बहीण, गायिका पलक मुच्छल आणि तिचा पती मिथुन हे स्मृती मानधनाच्या वडिलांची भेट घेताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, एका प्रसिद्ध रेस्टॉरंट ठिकाणी ही भेट झाली. यावेळी पलक स्मृतीच्या वडिलांचे आशीर्वाद घेतानाही दिसली.

रिपोर्टनुसार, स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि कदाचित जुने वाद मिटवण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण हा व्हिडिओ जुना आहे की लेटेस्ट, खरंच पलकने स्मृतीच्या वडिलांची भेट घेतलीय का, हे अद्याप समोर आलेले नाही. काही जण हा व्हिडिओ जुना असल्याचे म्हणत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

२०२५ च्या अखेरीस स्मृती आणि पलाशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर काही वैयक्तिक मतभेदांमुळे दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावरून हटवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT