Aamir Khan-Genelia Sitaare Zameen Par song released Instagram
मनोरंजन

Sitaare Zameen Par | 'कमळ ते मोदींचा फोटो; सेन्सॉर बोर्डाने आमिरच्या चित्रपटात केले 'हे' पाच बदल

Aamir Khan Sitaare Zameen Par |सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (CBFC) ने सितारे जमीन पर चित्रपटातील काही सीन्सवर बदल सुचवले.

स्वालिया न. शिकलगार

Aamir Khan Sitaare Zameen Par movie

मुंबई - सेन्सॉर बोर्डाने सोमवारी 'सीतारे जमीन पर' चित्रपटाला U/A 13+ प्रमाणपत्र दिले आहे. आमिर खान स्टारर चित्रपटात बोर्डाने काही बदल सुचवले. तीन वर्षानंतर आमिरचा चित्रपट येतोय. चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, जी ऑटिस्टिक मुलांच्या अवतीभोवती ही कहाणी फिरते. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. पण सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (CBFC) कडे गेल्यानंतर काही सीन्सवर बदल सुचवले.

बोर्डानुसार, निर्मात्यांना चित्रपटातील काही शब्द हटवावे लागले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोट ॲड करण्यासाठीही बोर्डाने सांगितले. सर्व कट आणि बदलानंतर चित्रपटाला रिलीज करण्यास परवानगी मिळालीय.

सूत्रांनुसार, आमिर खान एकीकडे आपल्या चित्रपटात बदल करण्यास तयार नव्हता. निर्माते आणि बोर्ड यांच्यात मतभेदही झाले. पण, सुधारणा सुचवत अंतिम प्रदर्शनासाठी परवानगी मिळाली. 'बिजनेस वुमन' ऐवजी, 'बिजनेस पर्सन' आणि 'मायकल जॅक्सन' शब्दाऐवजी लव्ह बर्ड शब्दाचा समावेश करण्यास सांगितले. रिवायजिंग कमिटीने हे बदल सुचवले आहेत. वामन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'कमल' (कमळ) हा शब्द देखील चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितले. आणि निर्मात्याला सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वाक्य जोडण्यास सांगण्यात आले. समितीने जुने डिस्क्लेमर काढून टाकावे आणि चित्रपटात व्हॉईस-ओव्हरसह एक नवीन डिस्क्लेमर जोडावा अशी सूचनाही केली.

निर्मात्याने बोर्डाच्या सर्व सूचना स्वीकारल्या आणि त्यांना U/A 13+ रेटिंग असलेले प्रमाणपत्र मिळाले. चित्रपट अंदाजे २ तास, ३८ मिनिटे आणि ४६ सेकंदाचा आहे. आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित 'सीतारे जमीन पर' २० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

SCROLL FOR NEXT