मनोरंजन

गायिका उर्मिला धनगर म्हणतेय, ‘तू जा गं पुढं मर्दानी’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन: 'तू न झुकणारी, तू गं लढणारी, नारी तू लई लई भारी' असे दमदार शब्द असलेलं 'तू जा गं पुढं मर्दानी' हे बहुचर्चित 'हवाहवाई' चित्रपटातलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या आवाजातलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी 'हवाहवाई' चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री निमिषा संजयन हवाहवाईद्वारे मराठीत पदार्पण करत आहे. तिच्यासह वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत.

महेश टिळेकर यांनीच लिहिलेलं हे गाणं पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. आतापर्यंत उत्तमोत्तम आणि हिट गाणी गायलेल्या उर्मिला धनगरनं हे गाणं गायिलं आहे. या गाण्याविषयी लेखक, गीतकार दिग्दर्शक महेश टिळेकर म्हणाले की, गायिका उर्मिला धनगरनं तिच्या आवाजाद्वारे या गाण्याचं सोनं केलं आहे. अतिशय दमदार असलेलं हे गाणं चाहत्याच्या भेटीस आले आहे. ( उर्मिला धनगर )

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT