singer hansraj raghuwanshi blessed with baby girl wife komal saklani stuns in brown gown look maternity photos viral
पुढारी ऑनलाईन : हंसराज रघुवंशी आणि कोमल सकलानी यांच्या घरी नवरात्रीच्या अगदी आधी चिमुकल्या परीचा जन्म झाला आहे. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली. दरम्यान, कोमलच्या डार्क ब्राऊन गाऊनमधील मॅटर्निटी फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यांना भरभरून पसंती मिळत आहे.
कोमल सकलानीचे लेटेस्ट मॅटर्निटी फोटोशूटही चर्चेत आहे. यामध्ये तिचा डार्क ब्राऊन गाऊनमधील लूक अतिशय एलिगंट आणि सुंदर दिसत आहे. या फोटोशूटचे फोटो या जोडप्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत.
गायक हंसराज झाले मुलीचे बाबा
गायक हंसराज रघुवंशी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यांच्या घरी १० ऑक्टोबर रोजी मुलीचा जन्म झाल्याची माहिती दिली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘जय माँ काली, बहुत बहुत धन्यवाद महादेव.’
भगवान शिवाची भजने आणि गाणी गाऊन हंसराज यांनी संगीतविश्वात स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे ‘मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभू नाथ रे’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
डार्क ब्राऊन गाऊनमध्ये कोमलचा रॉयल अंदाज
हंसराज आणि कोमल यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या अलीकडील मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंनी लोकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या छायाचित्रांमध्ये कोमलने डार्क ब्राऊन रंगाचा फ्लोअर-लेन्थ गाऊन परिधान केला आहे. यामध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
गाऊनला दिलेली रफल्ड नेकलाइन आणि ट्यूल फॅब्रिकचे अनेक थर याला स्टायलिश बनवत आहेत. तसेच, त्याच्या फ्लेअर्ड डिझाइनमुळे संपूर्ण लूकला सॉफ्ट आणि रॉयल टच मिळत आहे.
हंसराज रघुवंशी यांचा साधा आणि स्टायलिश लूक
या फोटोशूटमध्ये हंसराज रघुवंशी यांनी ऑफ-व्हाइट टेक्स्चर्ड शर्टसोबत डार्क ट्राउझर परिधान केला आहे. त्यांचा साधा आणि आकर्षक पोशाख कोमलच्या हेवी गाऊनसोबत परफेक्ट दिसत आहे. तर, त्यांची खास बन हेअरस्टाइल आणि रुद्राक्षाच्या ॲक्सेसरीजमुळे त्यांच्या लूकला अधिक उठाव मिळाला आहे. या फोटोंमध्ये हे जोडपे कधी वर्तमानपत्र वाचताना, तर कधी एकमेकांचा हात हातात घेऊन पोझ देताना दिसत आहे.