Abdu Rozik  
मनोरंजन

अब्दू रोजिकचं लग्न ढकललं पुढे; कारण आलं समोर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस १६' फेम आणि गायक अब्दु रोजिक त्याच्या लग्नामुळे काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. अब्दू आधी त्याची मंगेतर अमीरासोबत ७ जुलैला लग्न बंधनात अडकणार होता. मात्र अचानक त्याचे लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखीन वाट पाहावी लागणार आहे.

अब्दू रोजिकबदद्ल हेही माहिती आहे काय?

  • अब्दू रोजिक ७ जुलै २०२४ रोजी लग्न बंधनात अडकणार होता.
  • अब्दू रोजिकचं लग्न पोस्टपोर्न झाले आहे.
  • अब्दू रोजिकने करिअरसाठी लग्नाची तारिख बदलली आहे.

गायक अब्दू रोजिकने गेल्या महिन्यात मे महिन्यात लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. काही महिन्यांपूर्वी तो मंगेतर अमीराला भेटला होता आणि दोघांनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेने अब्दूचे चाहते खूपच खूश होते. तर दुबईत होणाऱ्या या विवाह सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खानही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मात्र, आता सध्या त्याचे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे, अब्दू रोजिकचे करिअर आहे. वास्तविक, दुबईतील कोका कोला एरिना येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या विजेतेपद बॉक्सिंग लढतीसाठी अब्दूला आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी अब्दूला बोलावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तो ते टाळू शकत नाही. या लढतीमुळे त्याचे करिअर बदलणार आहे. आणि म्हणूनच त्याने त्याचे लग्न पोस्टपोर्न केलं आहे.

या सामन्यामुळे आयुष्य बदलेलं

लग्नाबद्दल अब्दू रोजिक म्हणाला की, "आयुष्यात या विजेते पदासाठी लढण्याची संधी मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. हे वर्ष माझ्या करिअरसाठी आणि माझ्या लव्ह लाईफसाठी खूप चांगल्या गोष्टी घेऊन आलं आहे. पण दुर्दैवाने, यामुळे मला माझे लग्न काही काळ पुढे ढकलावे लागत आहे, कारण, या सामन्यामुळे आमचे भविष्य बदलणार आहे. आता फक्त माझ्याबद्दल नाही, तर अमीराच्या भविष्याचाही विचार करायचा आहे. त्यामुळे मला ही मोठी संधी सोडायची नाही."

'माझ्या या निर्णयाला अमीराचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण ते आमच्यासाठी खूप बदल घडवेल. माझ्या उंचीच्या व्यक्तीसाठी हे पहिलेच विजेतेपद आहे आणि मला आजकाल कठोर प्रशिक्षणही घ्यावे लागणार आहे. असेही तो म्हणाला. मात्र, याचदरम्यान अब्दू रोजिकने पुढची लग्नाची तारीख जाहिर केलेली नाही. त्याच्या चाहत्यांना मात्र, अब्दूच्या लग्नाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT