Sidhu Moosewala Phantom Song Controversy  
मनोरंजन

Sidhu Moosewala Phantom Song Controversy | 'फँटम' गाण्यामुळे वाद, पालकांनी सागा म्युझिकवर लावले गंभीर आरोप

सिद्धू मुसेवाला: 'फँटम' गाण्यामुळे वाद, पालकांनी सागा म्युझिकवर लावले गंभीर आरोप, कायदेशीर कारवाईचा इशारा दिला

स्वालिया न. शिकलगार

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीचे दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाच्या गाण्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्याचे गाणे 'फँटम'च्या रिलीज वरून मुसेवाला परिवाराने नाराजी व्यक्त केलीय.

नेमकी घटना काय?

कुठलीही परवानगी न घेता दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाचे 'फँटम' गाणे रिलीज करण्यात आले आहे. दिवंगत गायक सिद्धूचे बलकौर सिंह आणि चरण कौरने स्टेटमेंट जारी केलीय. त्यांनी म्हटले आहे की, सागा म्युझिकने परवानगी वा अधिकृतपणे कुठलीही मंजुरी न घेता गाणे रिलीज केलं आहे. मुसेवाला परिवाराचे म्हणणे आहे की, ते त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी पाऊल उचलणार आहेत.

परिवारने जाहीर केलं स्टेटमेंट

सिद्धू मूसेवालाच्या पालकांनी एक स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सागा म्युझिकने कुठलीही परवानगी घेता 'फँटम' गाणे रिलीज केलं आहे. परिवाराने म्युझिक लेबल रिलीज रोखण्यासाठी आणि चर्चा करून ही समस्या सोडवण्याची विनंती केली होती. तरीदेखील लेबलने गाणे रिलीज केले.

मुसेवाला परिवाराने हा देखील दावा केला की, सागा म्युझिककडे अशी कुठलेही कायदेशीर कागदपत्रे नाहीत, ज्यावरून सिद्ध होऊ शकेल की, त्यांना गाणे रिलीज करण्याची परवानगी देण्यात आली होती. स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आले आहे की, 'सिद्धू मूसेवालाचे 'फँटम' गाणे सागा म्युझिक आमच्या परवानगी विना रिलीज करत आहे. आम्ही रिलीज रोखण्यासाठी आणि ही समस्या सोडवण्यासाठी बातचीत करण्यासाठी विनंती केली होती. तरी देखील न जुमानता सागा म्युझिकने गाणे रिलीज केलं.

सिद्धू मूसेवालाची संपत्ती आणि अधिकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य कायदेशीर कारवाई करत आहोत.' बलकौर सिंह आणि चरण कौर यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करत दुसरे कलाकार आणि म्युझिक लेबल्सना विनंती केलीय की, सिद्धूचे कुठलेही गाणे सार्वजनिक करण्याआधी त्यांच्या परिवाराशी संपर्क साधावा.

सागा म्युझिकने काय सांगितलं?

सागा म्युझिकने मुसेवालाचे हस्ताक्षर ॲग्रीमेंटचा हवाला देत म्हटले आहे की, ते आपल्या कॉन्ट्रॅक्ट अधिकाराचा उपयोग करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT