Sidharth Malhotra and Kiara Advani  
मनोरंजन

Sidharth-Kiara : सिद्धार्थ-कियारा फेब्रुवारीत अडकणार विवाहबंधनात?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लॉन्ग टाईम डेटिंग करत आहेत. (Sidharth-Kiara) आता ते २०२३ मध्ये नव्या वर्षात लग्नगाठ बांधतील असा अंदाज वर्तवला जात आहे. रिपोर्टनुसार, एका शाही कार्यक्रमात आणि कडक सुरक्षा व्यवस्था या लग्न समांरभाच्यावेळी ठेवण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात हे दोघे कपल विवाहबंधनात अडकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Sidharth-Kiara)

रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराचे लग्न ६ फेब्रुवारी रोजी जैसेलमेर पॅलेस हॉटेल येथे होईल, अशे म्हटले जात आहे. ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी याच ठिकाणी प्री-वेडिंग फंक्शन्स होतील. यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि इतर मंडळी उपस्थित असतील. मेहंदी, हळद आणि संगीत सेरेमनीदेखील पार पडेल.

परंतु, या कपलकडून कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. दोघांना फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) च्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झालीय.

सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपट 'शेरशाह' मध्ये कियारा आडवाणीने स्क्रीन शेअर केली होती. यानंतर दोघांची रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली. दोघे अनेकदा स्पॉटदेखील झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT