मनोरंजन

Shweta Shinde : वेस्टर्न आऊटफिटमध्येही बातचं न्यारी!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी अभिनेत्री, टीव्ही दिग्दर्शिका श्वेता शिंदे (Shweta) हिचा नेहमी साडीत पेहराव दिसतो. पण, यंदा तिचा वेस्टर्न लूक पाहायला मिळत आहे. तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट वनपीस घातला आहे. ओपन हेअरस्टाईलमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. एका मराठी चॅनेलच्या लॉन्चवेळी तिने वेस्टर्न लूक केला होता. (Shweta)

याआधी तिने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले होते. या फोटोला तिने Lady in PINK ? अशी कॅप्शनही दिलीय. आणखी काही फोटोंमध्ये तिने साडी नेसलीय. Me and my never ending Saree love.❤️ अशी कॅप्शनही तिने या पोस्टला दिलीय. काही दिवसांपूर्वी तिने व्हाईट कलर फ्लोरल साडी नेसली होती.

छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री म्हणून श्वेता शिंदेची ओळख आहे. श्वेता शिंदेने मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अवंतिका', 'अवघाची हा संसार' आणि 'वादळवाट' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

तिच्या हटके लूकवर नेटकरी नेहमीच फिदा होता. प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या चाहत्यांकडून होत असतो. श्वेताच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT