shriya saran 
मनोरंजन

Shriya Saran : श्रियाचा मालदीवच्या समुद्रात स्टनिंग लूक, फॅमिलीसह टूरवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन सध्या आपल्या कुटुंबासोबत व्हेकेशन टूरवर आहे. अभिनेत्री श्रिया मालदीवला सुट्ट्यांचा एन्जॉय घेताना दिसते. नुकताच तिने आपला ४० वा वाढदिवस साजरा केलाय. तिने आपल्य़ा वाढदिवसाचे औचित्य साधून काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामला अपलोड केले होते. नेटकर्‍यांनी तिला  बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच हार्ट इमोजी आणि लव्हेबल इमोजीही शेअर केल्या. श्रियाने आणखी एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. हे फोटो आणि व्हिडिओ मालदीवचे आहेत. तिने एका व्हिडिओला About yesterday अशी कॅप्शन लिहिलीय. तर आणखी एका व्हिडिओ आणि फोटोंना Thank you for all your love , thank you for a wonderful day @amillamaldives अशी कॅप्शन लिहिलीय.

मालदीवहून तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय. ती आपल्या बाळासमवेतही एन्जॉय करताना दिसते.

श्रिया सरनने आपला ठसा उमटवण्यासाठी बराच काळ संघर्ष केला. यानंतर सुपरस्टार रजनीकांतसोबत आलेल्या 'शिवाजी द बॉस' या चित्रपटातून तिला ओळख मिळाली.

श्रियाचा जन्‍म ११ सप्टेंबर १९८२ रोजी डेहराडूनमध्ये झाला. तिला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. या छंदामुळे ती शास्त्रीय आणि पाश्चात्य नृत्य प्रकारातही पारंगत झाली. एका सामान्य कुटुंबातील श्रिया सरनने कधी विचारही केला नव्हता की तिचा हा छंद तिला एक दिवस इतका मोठा स्टार बनवेल. तिला पहिल्यांदा एका म्युझिक अल्बममध्ये काम मिळाले. हा अल्बम केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. दृश्यम, संतोषम, अर्जुन यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT