मनोरंजन

मजेशीर, भयानक राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’चा टीझर आऊट!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्त्री २' मध्ये राजकुमार राव पुन्हा विकीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, मॅडॉक फिल्म्सच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मुंज्या' सोबत थेट थिएटरमध्ये हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या फ्रेमपासून निर्माते हे स्पष्ट करतात की सिक्वेल अधिक मजेदार, भयानक आहे आणि त्यात वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनण्यासाठी तो सज्ज आहे. राजकुमार रावचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे.

अधिक वाचा-

राजकुमार रावचे पाठोपाठ रिलीज होत असणारे चित्रपट हे दाखवून देतात की तो कमालीचा अभिनेता आहे. तो 'श्रीकांत' चित्रपटात दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती, तर 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये तो क्रिकेटर-कोचच्या भूमिकेत दिसला होता. यामध्ये जान्हवी कपूरसोबतची त्याची पडद्यावरची केमिस्ट्री चर्चेत आली होती.

अधिक वाचा-

'स्त्री' नंतर 'मिस्टर अँड मिसेस माही' हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आणि आता असे दिसते आहे की 'स्त्री 2' पूर्वीचे रेकॉर्ड देखील मोडेल, अशी अपेक्षा फॅन्सकडून व्यक्त केली जात आहे. पण इथेच न थांबता राजकुमार 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'मध्ये अभिनेता तृप्ती डिमरीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या पाईपलाइनमध्ये आणखी काही प्रोजेक्ट आहेत ज्यांची तो लवकरच घोषणा करेल!

अधिक वाचा-

SCROLL FOR NEXT